shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि हॅन्ड सॅनिटाइजर च्या अवाजवी किंमतीमुळे ग्राहकांची लूट नियामक मंडळाने लक्ष द्यावे.

     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वारंवार हात धुण्यासाठी वापर होणाऱ्या हॅन्ड सॅनिटाइजरचे अनेक प्रकार अनेक रंगात, अनेक फ्लेवर मध्ये, अनेक साईज मध्ये सर्व मेडिकल्स आणि बाजारात सर्वत्र उपलब्ध झाले आहेत. मात्र या हॅन्ड सॅनिटाइजर च्या अव्वाच्या सव्वा किंमती गोरगरीब सर्व सामान्य ग्राहकांची अक्षरशः आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.




      कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि हॅन्ड सॅनिटाइजरचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे एरवी बाजारात कधीही कुठेही न दिसणार्या मास्क आणि हॅन्ड सॅनिटाइजरचे सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. 

     कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय म्हणून वापरात येणार्या या फेस मास्क आणि सॅनिटाइजर च्या किंमती एखाद्या औषधांपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मास्क आणि हॅन्ड सॅनिटाइजर च्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात  आहे. 

      संपूर्ण देश आणि राज्य कोरोना विषाणू महामारीच्या संकटात सापडला असताना मास्क आणि हॅन्ड सॅनिटाइजर उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मास्क आणि हॅन्ड सॅनिटाइजर्सच्या किंमती शेकडो रुपये एवढी अवाजवी स्वरूपात वाढवून मनमानी पद्धतीने या अवाजवी किंमतींच्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्य  जनतेची प्रचंड आर्थिक लूटमार करत आहेत. गोरगरीब सर्व सामान्य जनतेची होणारी सदरची लूटमार थांबवण्यासाठी संबंधित नियामक मंडळाने या बाबतीत लक्ष देऊन यावर निर्बंध घातले पाहिजे हीच अपेक्षा.
close