shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माणगांव गटविकास अधिकारी श्री. सतीश गाढवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली वडवली कोंड आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक मदत

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन आणि संचारबंदीमुळे रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील विविध ठिकाणच्या ग्रामीण व दुर्गम अतिदुर्गम भागात वसलेल्या मूलनिवासी आदिवासी समाजातील गोरगरीब कुटुंबांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे आर्थिक बजेट कोलमंडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 
     


लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत माणगांव तालुक्यातील आदिवासी वाड्या पाड्यात वस्त्यांवर अत्यंत दुर्गम ठिकाणी राहणार्या मानवी सभ्यतेतील मूलनिवासी असलेला आदिवासी समाज हाताला मिळेल ते अत्यंत मेहनतीचे काम करून आपल्या पोटाची खळगी भरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर धडपडत असतात.     

परंतू सध्या कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे माणगांव तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांची मोठी परवड होत आहे. लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत तालुक्यातील आदिवासी समाजाची कोणत्याही प्रकारची परवड होवू नये म्हणून माणगांव पंचायत समितीच्या माध्यमातून गटविकास अधिकारी श्री. सतीश गाढवे यांच्या नेतृत्वाखाली वडवली कोंड तालुका माणगांव येथे अदिवासी कुटुंबांना किराणा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. तसेच तालुक्यात ठिकठिकाणी कोरोंटाईन केलेल्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली. त्याच बरोबर त्यांच्या इतर सोयी सुविधा यांची पाहणी करण्यात आली. 
या प्रसंगी माणगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सतीश गाढवे, विस्तार अधिकारी श्री. गायकवाड व श्री. मिंडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.
close