shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला त्यांनी एक लाखाची मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.


  • मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश तसीलदार याच्या कडे सुपूर्द.


बदलापूर -(जाफर वणू )
     बदलापुर शहरात करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी  सरकारला हातभार म्हणून उद्योजक प्रवीण बाळकृष्ण भोईर यांनीकरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधी एक लाख एकशे एक रुपयांचा (१,००,१०१) धनादेश अंबरनाथचे चे तहसीलदार देशमुख साहेब यांच्याकडे सुपूर्द केला. “कोवीड-19 या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून उद्योजक प्रवीण भोईर याच्या माध्यमातून धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायत्ता निधी-कोवीड-19 मध्ये जमा करण्यात आला आहे.त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील करोना बाधिताना होणार आहे.




     यावेळेस त्यांच्यासोबत कुळगाव बदलापूर नगरपरिषद चे नगराध्यक्ष प्रियेश जाधव, नगरसेवक तुकाराम म्हात्रे ,उद्योजक सचिन भोईर, निखिल परब उपस्थित होते. कोरोना आजारामुळे देशावर फार मोठे संकट आलेले आहे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आव्हान देखील केले होते की मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आपण मदत करावी जेणेकरून सदर मदत ही देशावर व आपल्या राज्यावर आलेल्या महाभयंकर आजारावर तोंड देण्याकरता उपयोगी पडेल. सरकारी तिजोरीत ताण पडत आहे संपूर्ण देश ल‌ॉक डाऊन मुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेले आहे त्यामुळे एक छोटीशी मदत सरकारला करावी या उद्दिष्टाने सदर चेक सुपूर्द केलेला आहे.

     विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटात जनतेसोबत ठाम उभापणे उभा राहणार असल्याचे असे उद्योजक प्रवीण भोईर यांनी म्हटले.
close