shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-काळेवाडी पूलासह शहरातील हे रस्ते वाहतूकीस बंद राहणार..!


पिंपरी-चिंचवड: 
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उपाय म्हणून शहरातील अनेक भाग सील केले आहेत. मात्र तरी देखील नागरिक रस्त्यावर बाहेर पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केलीयं. पिंपरी ते काळेवाडीला जोडणारा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील काही रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. हा बदल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत शहरातील अनेक रस्ते बंद असणार आहेत. पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 
बंद करण्यात आलेले मार्ग खालील प्रमाणे –




● पिंपरी आणि काळेवाडी या दोन गावांना जोडणारा काळेवाडी पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद.

● चांदणी चौक पीएमटी चौकाजवळ भोसरी – पूजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅक्झिनियस केक शाॅप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड – पिंपरी चिंचवड महापालिका भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाणे चौक – लोंढे गिरणी – विनय सुपर मार्केट – आई तुळजाभवानी मंदिर – मारुती मंदिर – पूजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स

● क्रांतिवीर नगर थेरगाव गावठाण मधील भाग –रहाटणी लींक रोड वरील स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट – रहाटणी लींक रोड – आस्था मेडिकल स्टोअर्स तेथून आत हॉटेल सिल्वर 9 कडे जाणारा रोड – होटेल सिल्वर 9 – ए विंग एस ओरा सोसायटी – रहाटणी लींक रोड वरील स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट तसेच डांगे चौक – आदित्य बिर्ला रुग्णालय चौक – तापकीर चौक – काळेवाडी फाटा चौक – डांगे चौक

● दिघी गावठाण स्कायलाइन सोसायटीच्या चतुःसिमा – हॉटेल द्वारकाधीश – ओम सुपर मार्केट – फेज 3 रोड – ओम साई नर्सरी – श्री साई हॉस्पिटल – हॉटेल द्वारकाधीश वरील मार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावर केवळ अग्निशमन विभाग, पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
close