shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव(हिंगोली) तोष्णीवाल महाविद्यालयात ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स संपन्न

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालतील पदार्थ विज्ञान विभागाकडून "बेसिक इन इलेक्ट्रॉनिक्स सर्किटस" या विषयावर ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स संपन्न करण्यात आला.



संपूर्ण जगभर सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामोरे आलेल्या लॉकडाउन च्या वेळेत शिक्षणक्षेत्रामध्ये अमुलाग्रह बदल घडत आहेत. याच बदलाचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाने एक पाऊल पुढे टाकत " बेसिक इन इलेक्ट्रॉनिक्स सर्किटस"  हा कोर्स  ऑनलाईन रित्या सुरू केला. सदरील कोर्स ला विद्यार्थी आपल्या घरीच राहून सहभागी होऊन ज्ञानार्जन करू शकतो. त्यामुळे या कोर्ससाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. सहभागी झालेल्या सर्वाना महाविद्यालायकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 
 या प्रणाली मुळे विद्यार्थी व शिक्षक यांचा दररोज संपर्क शक्य होऊ शकतो. तसेच याचा वापर करून लॉक डाउन मुळे बंद पडलेल्या तासिका वर्गांना पुन्हा काही प्रमाणात का होई ना पण चालना मिळू शकते. 
सदर सर्टिफिकेशन कोर्स चे समन्वय डॉ. बजाज व डॉ. राजेश जोशी यांनी या कोर्स चा अभ्यास क्रम तयार केलेला असून यात निरनिराळे youtube वरील प्रात्यक्षिक विडिओ वापरून हा कोर्स अतिशय प्रभावी पणे राबविला आहे. त्यांच्या या कोर्स मुळे विद्यार्थ्यांना नकीच फायदा होणार व पुढील अभ्यास करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
close