राहुरी :
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्यात राहुरी चे संपर्क समन्वयक (Communication Coordinator) म्हणुन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सूचनेनुसार व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी साहेब यांचे आदेशान्वये राहुरीचे तहसीलदार मा. फसियोद्दीन शेख साहेब यांनी पत्र क्र. कावी/दंडव्य/754/2020 राहुरी दि. 27/04/2020 अन्वये निवडीचे पत्र दिले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र शासनाच्या शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्काराने सन्मानित झालेले प्रथम भारतीय सुवर्ण पदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू असा आप्पासाहेब ढुस यांचा परिचय असुन आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्यात संपर्क समन्वयक (Communication Coordinator) म्हणुन शासनासते ते सहकार्य करनार आहेत. आप्पासाहेब ढुस हे भारत सरकारचे अधिकृत परवाना धारक ह्याम (HAM) रेडीयो ऑपरेटर असुन कोरोना च्या आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्यात राज्यात अती तातडीच्या प्रसंगी राज्याची सम्पर्क व्यवस्था बळकट असावी म्हणुन ह्याम रेडीयो ऑपरेटर आप्पासाहेब ढुस यांचे सहकार्य घेणे बद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या सूचने नुसार उपरोक्त नेमणूक झाली असुन जिल्ह्यातील उपलब्ध ह्याम रेडीयो ऑपरेटर्सची मदत घेवून सर्व तालुके जिल्ह्याला जोडून या माध्यमातून अती तातडीची सम्पर्क व्यवस्था जिल्ह्यात उभारनार असल्याचे आप्पासाहेब ढुस यानी सांगितले व मुख्यमंत्र्यानी जो माझेवर विस्वास व्यक्त केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.



