पुनाळ/प्रतिनिधी:-सुरेश वडर:
भारत देश हा लोकशाही प्रदान देश आहे.येथील गल्ली ते दिल्लीचा कारभार भारतीय संविधानावर आधारित चालतो. गाव पातळीवरील विकास करण्यासाठी ग्रामपंचायतच्या ठिकाणी सरपंच व सदस्य यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन देतो.तालुक्याचा विकास करण्यासाठी तालुका पंचायत या ठिकाणी पंचायत समिती सदस्य निवडुन देतो,जिल्ह्यातील विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य निवडुन देतो. तसेच नगरपंचायत व नगर पालिका या ठिकाणचा विकास करण्यासाठी आपण नगरसेवक व नगराध्यक्ष यांना लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन देतो.मोठ्या शहरातील विकास करण्यासाठी महानगर पालिकेच्या माध्यमातून आपण नगरसेवक व महापौर यांना निवडुन देतो.राज्यातील कारभार पहाण्यासाठी आपण आमदारांना निवडुन देतो.केंद्रातील कारभार पहाण्यासाठी आपण खासदारांना निवडुन देत असतो.
वरील सर्व लोकप्रतिनिधींना आपण एवढ्यासाठी निवडून देत असतो की, जनतेच्या अडी-अडचणी जाणुन घेऊन ते सोडविण्यासाठी ग्रामपंचायत,तालुका पंचायत,नगर पंचायत,नगरपालीका,महानगरपालिका,विधानसभा,
लोकसभा या ठिकाणी प्रशासना समोर बैठकीत प्रश्न मांडणे व विकासाच्या कामी शासकीय विविध विकास योजना मंजुर करुन आपआपल्या मतदारसंघात आणुन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन,जनतेच्या मुलभुत पायाभूत सुविधा अन्न,वस्र,निवारा यासह विविध योजनेच्या माध्यमातून सातत्याने विकास करणे हे प्रामुख्याने काम असते.
हे वरील सर्व लोकप्रतिनीधी निवडणुका लढवतांना साम,दंड,भेद या बळाचा वापर करुन निवडणुक लढवलेली असते.निवडणुक जिंकण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करतात.महाघड्या हाॕटेलच्या ठिकाणी मांसाहारी जेवन,विविध नामांकीत कंपनीचे दारु देतात,तसेच संसारउपयोगी विविध साहित्य देऊन मतदारसंघातील मतदारांची मने जिंकुन निवडणुका जिंकत असतात.
आज आपल्या भारत देशात कोरोना व्हायरस विषाणूने महाभयंकार प्रलयकारी हाहाकार माजवला आहे.या व्हायरसने अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.तर असंख्य लोकांना या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे.या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकच उपाय आहे.तो म्हणजे साबणांने वरचेवर हात धुणे,तोंडाला मास्क वापरणे,सॅनिटायझरचा सतत वापर करणे,कामा व्यतिरिक्त बाहेर जास्त न फिरणे,शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे बंदनकारक आहे.
या रोगा पासुन मुक्ती मिळविण्यासाठी व कोरोना मुक्त भारत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लाॅक डाऊन व संचारबंदी केली आहे. लोकप्रतिनिधी हे जनतेचे काळजीवाहु असतात.अशा परिस्थिती त्यांना मास्क,सॅनिटायझर,साबण,हॅन्ड ग्लोज व तसेच जीवन आववशक वस्तू देणे गरजेचे होते.पण या सुविधा बोटावर मोजता येतील इतक्याच लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघात पुरवल्या आहेत.मग बाकीचे लोक प्रतिनिधी गेले कुठे असा रोखठोक सवाल सुविधा पासून वंचित असलेल्या मतदार संघातील जनतेकडून हा सुर उमठत आहे. इतर वेळी मात्र वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करुन डिजिटल बोर्ड,जेवणावळी देत असतात.हे खर्च टाळुन या संकटकाळी जनतेच्या सुविधाकामी खर्च करणे गरजेचे आहे.पण काही ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीत घरातून बाहेरच पडलेले नाहीत व जनतेची विचारपूस देखील केलेली नांही.मग आपण सर्वांनी वरील सर्व लोकप्रतिनिधींना काय म्हणायचे हा सवाल या ठिकाणी उपस्थिती होतोय.माझा साहेब,आंमचेनेते,भाऊ,दादा, आण्णा यासह विविध उपमा,उपाधी आपण देतो मग हे सगळे या संकटसमयी गेले कुठे..??


