shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनिता वानखेडे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल


  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या मागणीला यश

ढोरकीन : औरंगाबाद शहरात व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात रोज तीन-चार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशीच स्थिती राहिली तर कोरोनावर मात करणे कठीण होऊ शकते यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा अनिता वानखडे यांनी (दि.27) रोजी विभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरें यांना निवेदनाद्वारे केली होती. मुख्यमंत्री यांनी या मागणीची त्वरीत दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग केले आहे.




मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात वानखेडे यांनी म्हटले होते की, जगात कोविड 19 या विषाणू नी कहर माजवला आसून लाखो नागरिक याचे शिकार झालेले आहेत तर आज पर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या जागतिक महामारी ने भारतात आपले पाय रोवले असून भारतात सुद्धा या कोरोना विषाणूची लागण झाली असून यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून यावर उपाय योजना म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी देशात सुरुवातीला 21 दिवस व नंतर ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करत देशवासीयांनी घरात थांबून कोरोना विषाणूची लागण होणार नाही यासाठी स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि कोरोना हद्दपार करा असा संदेश दिला. याचे चांगले परिणाम सुद्धा दिसायला लागले आहेत. मा पंतप्रधान यांच्या आवाहानाला राज्याचे मुख्यमंत्री सह आरोग्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ सह राज्यातील उच्च पदस्थ अधिकारी कर्मचारी ,पोलीस, डॉक्टर, नर्स,आशा वर्कर खाजगी डॉक्टर आदी आपल्या जीवाची बाजी लाउन कोरोनाशी दोन हात करत आहे. त्यात त्यांना मोठे यश मिळत आहे परंतु मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे या साठी कायद्याची कडक अंमलबजावणी करून जनतेला अवगत करून जनतेने याचे पालन करणे आवश्यक आहे. या बाबत औरंगाबाद जिल्हा व जिल्ह्यातील नागरिक व प्रशासनातील दिली जानारी ढिल या मुळे कोरोना विषाणू चा फैलाव जिल्हाभरात वाढत आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर मराठवाडा ची राजधानी असलेले औरंगाबाद शहरात मुंबई पुणे सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते यावर तातडीने उपाय योजना होणे गरजेचे आहे. अशी मागणी केली होती यावर मुख्यमंत्र्यांनी या मागणीची तातडीने दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविली आहे. असा मेल वानखेडे यांना पाठवून कळविण्यात आले आहे.
close