बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील वावे मांद्रज बौद्धवाडी येथील पंचशील स्वंय सहाय्यता महिला बचत गट वावे मांद्रज या रास्त भाव धान्य दुकानातून कार्डधारकांना १४ एप्रिल डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शासनाकडून आलेले मोफत तांदूळ वाटप करण्यात आले.
या वेळेस या रास्त भाव धान्य दुकानाचे चालक सामाजिक व सेवाभावी कार्यकर्ते सदानंद येलवे यांनी आलेले मोफत धान्य ठेवण्याकरिता जागा अपुरी असल्याने स्वतःच्या खर्चाने नवीन शेड बांधून त्या ठिकाणी धान्य सुरक्षित ठेवण्यात आले.
सदर रास्त भाव धान्य दुकाना अंतर्गत एकूण १५० कार्डधारक आहेत. या कार्ड धारकांना धान्य वाटप करण्यापूर्वी सॅनिटायजर व साबण याचा हात धुण्यासाठी वापर करून सोशल डिस्टनसिंग ठेवून धान्य वाटप करण्यात आले. प्रत्येक कार्डधारकास प्रत्येक माणसी ५ किलो तांदूळ वाटप करण्यात आले.जनतेला शासनाकडून मोफत धान्याचा लाभ मिळाल्यामूळे जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.