shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कडून निजामपूर विभागातील विक्रम रिक्षा चालकांना अन्नधान्य वाटप

बोरघर /  माणगांव ( विश्वास गायकवाड ) 
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लाॅकडाऊन संचारबंदी लावली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील सर्व विक्रम, रिक्षा आणि मिनिडोअर चालकांच्या विक्रम, मिनिडोर आणि रिक्षा घरी जाग्यावर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आर्थिक सोर्स बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदतीचा हात देण्यासाठी माणगांव, महाड आणि पोलादपूरचे लोकप्रिय आमदार माननीय भरतशेठ गोगावले नेहमी प्रमाणे पुढे आले. 





रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील दोनशे दहा विक्रम रिक्षा चालकांना माणगांव, महाड, पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांनी माणगाव प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर मॅडम' यांच्या उपस्थितीत अन्नधान्य वाटप करण्यात आले. 

या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, प्रमोदशेठ घोसाळकर, विभाग प्रमुख प्रसाद गुरव,सुधीर पवार, प्रणव कोळवनकर,दत्ताराम नाडकर पाटील,निजामपूर पोलिसस्टेशन चे सिनियर ऑफिसर,आणि  लाभार्थी इत्यादी उपस्थित होते.
         
तसेच अपोलो चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बैंक यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, या वेळी सत्तावन्न रक्त दात्यांनी रक्त दान केले, रक्तदान करणार्या रक्त दात्यांना माननीय आमदार  गोगावले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
close