shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Coronavirus| कोरोना महामारी संकटात सभागृहनेते स्वप्निलभाऊ शिंदे यांनी केले किराणा मालाचे मोफत वाटप


अहमदनगर | प्रतिनिधी |( विशाल जेठे) 
     अहमदनगर जिल्ह्यात दानशुर व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेले देवाज् ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष तथा अहमदनगर महानगर पालिकेचे सभागृहनेते मा.स्वप्निलभाऊ शिंदे व नगरसेवक मा.योगीराज गाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जगभरात फोफावलेल्या कोरोना महामारी संकटामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे,ज्यांचे पोट-पाणी हातावर आहे,अशांची उपासमार होत आहे .शासकीय योजना पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे.अनेकांना आपले पोट भरण्यासाठी दररोज काम करावे लागते परंतू लाॅकडाउन मुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे,




      या सर्व पार्श्वभुमीवर देवाज्  ग्रुप वतीने प्रभाग क्रमांक- ४ सावेडी उपनगरातील रोज दोनशे लोकांना किराणा तसेच अत्यावश्यक सेवा देवाज् ग्रुपवतीने पुरवल्या जाणार असल्याचे सांगून आज प्रभाग क्रमांक-४ मधील सिव्हिल हडको , तारकपूर परिसर येथील गरजूंना घरपोच किराणा माल मा.स्वप्नीलभाऊ शिंदे व मा. योगीराज गाडे यांंच्या शुभहस्ते देण्यात आले.

        या वैश्विक महामारी तून संपूर्ण भारत लवकरच बाहेर पडेल यासाठी सर्व नागरिकांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे असे सभागृहनेते मा.स्वप्नीलभाऊ शिंदे व देवाज् ग्रुपच्या वतीने सर्व अहमदनगर वाशीयांना विनम्रपुर्वक आवाहन करण्यात आले.
        
      गरजूंची मदत करणे हे देवाज् ग्रुपचे मुख्य ध्येय असून यासाठी देवाज् ग्रुप सदैव कटीबदध्द आहे, असेही मा.स्वप्निलभाऊ शिंदे यांचेकडून सांगण्यात आले. या महान कार्यामुळे देवाज् ग्रुपचे सर्वत्र अभिंनंदन व कौतुक होत आहे.
close