जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात.
हे पीक राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते. यात ६ ते ११% प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात. मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. यामुळे रक्तातील कोलेस्टेटरॉल कमी होते तसेच मधूमेहाचे प्रमाण कमी होते.
एक तृणधान्य. नाचणी ही वर्षायू वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इल्युसाइन कोरॅकोना आहे. ती मूळची आफ्रिकेतील असून सु. ४,००० वर्षांपूर्वी भारतात तिची लागवड झाली असावी, असे मानतात. उंच प्रदेशातदेखील वाढण्यासाठी तिचे अनुकूलन झालेले असून हिमालयात ती सस. पासून सु. २,३०० मी. उंचीपर्यंत वाढू शकते. दक्षिण भारतात सस.पासून सु. १,५०० मी. उंचीपर्यंत तिची लागवड केली जाते. नाचणीचे रोप ६०-१२० सेंमी. उंच व सरळ वाढत असून त्याच्या तळाशी अनेक फुटवे असतात. खोड चपटे व बोटाएवढे जाड असते. पाने अरुंद आणि लांब असून त्यांचा तळाकडील भाग खोडाभोवती आवरणासारखा वेढलेला असतो. खोडाच्या टोकावर ४-६ व जाड कणिशांचा झुबका असतो. कणिशकात कुसळविरहित व ३-६ फुले दाटीवाटीने असतात. प्रत्येक कणिशकात ४-७ गोलसर व चपट बिया असतात. बिया गडद तांबूस लाल रंगापासून पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये असतात.
नाचणी पौष्टिक, शामक व मूत्रल आहे. नाचणीमध्ये जलांश १३.१%, प्रथिने ७.३%, मेद १.४%, खनिजे २.७%, कर्बोदके ७२% असतात; शिवाय जीवनसत्त्वे अ, ब१ आणि निकोटिनिक आम्ल असतात. नाचणीचे बी खाद्य असून दाण्यांपासून भाकरी, आंबिल किंवा लापशी करतात. चव गोड, तुरट किंवा कडवट असते. ती पचायला भरपूर हलकी असते. त्वचेच्या रोगांवर पोटिस बांधण्यासाठी उपयोग होतो. नाचणीत लोह जास्त प्रमाणात असल्यांमुळे रक्तक्षयामध्ये उपयोगी आहे.
नाचणी हे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे तृणधान्य आहे.
या पिकाची लागवड प्रामुख्याने घाट व उप - पर्वतीय विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये, तसेच कोकणविभागातील जिल्ह्यामध्ये केली जाते. नाचणी पीक मुख्यत्त्वेकरून डोंगर उतारावरील हलक्या जमिनीत घेतले जाते दुर्गम प्रदेशात राहणार्या गरीब, आदिवासी लोकांचे नाचणी हे प्रमुख अन्न आहे. सन २००८ -०९ महाराष्ट्रामध्ये नाचणी १.३२ लाख हेक्टर क्षेत्रावरती घेतली गेली. उत्पादन १.११ लाख टन असून सरासरी उत्पादकता ९०० किलो प्रती हेक्टरी आहे. सन १९९९ -२००० सालापासूनची आकडेवारी पाहता या पिकाची उत्पादकता कमी कमी होत आहे.
आहाराच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये असणार्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास तत्सम तृणधान्य न संबोधता सत्वयुक्त धान्य म्हणणे जास्त योग्य ठरेल. सध्या प्रचलित असणारी महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, भात, मका सर्वसामान्य माणसाच्या आहारात वापरली जातात. नाचणी हे प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात राहणार्या गरीब आदिवासी लोकांचे प्रमुख अन्न आहे.
आयुर्वेदिकदृष्ट्या नाचणीमध्ये द्रव अंश १३ टक्के असल्याने ते शीतल असते त्यात वसा मय द्रव कमी असल्याने पचण्यास हलके असते. पौष्टिक द्रव्याच्या दृष्टीने नाचणीमध्ये ७० ते ७३ टक्के असल्यामुळे तो गरिबांचा मांसाहार आहे. गव्हामध्ये पौष्टिकता नाचणी पेक्षा कमी म्हणजे ६८ टक्के असते. परंतु त्यातल्या पचनाचा भाग मात्र फक्त ३७ टक्केच असतो. न जिरणारा भुसा म्हणजेच न विघटित होणारे तंतू हा शाळू व मक्यानंतर फक्त नाचणीत सापडतो. या भूस्यामुळे शरीरातील स्निग्ध्यांचे संतुलित शोषण होते.
आपण अन्न घटकांचा विचार करताना राखेचा किंवा कार्बनचा विचार करत नाही. वास्तविक हाच घटक पित्तशामक असतो. आपल्याकडे पिकणारी परदेशी ओटस या दोन्हीमध्ये हे प्रमाण ३ टक्के असते. म्हणूनच पित्तशमनासाठी आपण आंबिल घेतो. मेंदूला चेतना देणारे काही घटक आहेत. उदा. विशिष्ट फॉस्फेटस ही केळी आणि नाचणी यात भरपूर असतात. म्हणूनच केळाचे दह्यामध्ये केलेले शिकरण आणि नाचणीची भाकरी ही लहान मुलांच्या (वाढीच्या वयात) वाढीसाठी अनुपम ब्रेन टॉंनिक आहे.
नाचणी धान्यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्याने बद्धकोष्ठता होत नाही.त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळू हळू रक्त प्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणार्या लोकामध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.
सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आहारातील अनियमिततेमुळे माणसांना निरनिराळ्या आजाराने ग्रासले आहे. त्यामध्ये मधुमेहाचा वरचा नंबर लागतो. मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने नाचणीयुक्त आहाराला फार महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सन २००५ साली भारताचे ५७ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रासलेलेल असतील. त्यानंतर जगातील असणार्या एकूण मधुमेही चार रुग्णांपैकी एक मधुमेही भारतामध्ये आढळून येईल. महुमेहामुळे हृदय विकाराचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्याचप्रमाणे डोळ्यातील मोतीबिंदू अशा मधुमेही रूग्णामध्ये अधिक दिसून येतो. नाचणी धान्यामध्ये असणार्या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता नाचणी हे धान्याचे पीठ तयार करून त्यापासून चपाती, रोटी, आंबील, शेवया, पापड अशा असंख्य स्वरूपाची मुल्यवर्धित उत्पादने भाजून, उकडून, वाफवून, किंवा अंबवून केली असता अत्यंत सत्त्वयुक्त होतात. नाचणीचे विविध पदार्थ बनविण्याचे कौशल्य मिळवून सातत्याने त्याचे सेवन केल्यास प्रकृती उत्तम राहील. त्याचबरोबर विक्रीयोग्य पदार्थ बनवून त्याची विक्री केल्यास आर्थिक स्थिती सुधारेल.
नाचणी माल्ट किंवा नाचणी सत्त्व - नाचणी धान्य साफ करून जवळपास २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर ते पाण्यातून काढून पातळ सुती कपड्यात त्याला मोड येण्यासाठी बांधून ठेवावेत. मोड साधारणपणे १ सें. मी. लांबीचे आल्यानंतर धान्य सुकवण्यासाठी ताटामध्ये उन्हात चांगले वाळवून घ्यावे. धान्य पूर्ण सुकल्यानंतर हाताने रगडून मोड धान्यापासून वेगळे करावेत. नाचणी धान्य कढईत मंद आचेवर ५ ते १० मिनीटे गरम करून घ्यावेत नंतर या धान्याचे पीठ करून घ्यावे. पीठ चांगले चाळून घ्यावे. हेच पीठ बाजारात नाचणी सत्त्व म्हणून विकले जाते. या नाचणी सत्त्वाचाच बहुउपयोगी पीठामध्य वापर करून हलवा, बिस्कीट, बर्फी तसेच गोड लापशो बनवता येते.
बहुउपयोगी पीठ - बहुउपायोगी पीठ बनविण्यासाठी कोणत्याही धान्याचे माल्ट किंवा सत्व वापरता येते. यामध्ये शेंगदाणे भाजून त्याची सालपट काढून बारीक पीठ तयार करावे. तसेच काळे सोयाबीन भाजून त्याचे तयार केलेले पीठ तसेच गव्हाचे सत्वाचे पीठ वापरता येते. या बहुउपयोगी पिठाचा वापर करून लहान मुलांचा शिशु आहार बनविला जातो.
शिशु आहार - आईचे दुध लहान बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहेच परंतु सहा महिन्यानंतर बाळाची वाढ होते आणि त्याची भुकही वाढते. त्यामुळे त्याचे फक्त आईच्या दुधावर पोट भरत नाही. अशावेळी प्रत्येक आई बाळास तांदळाची पेज, डाळींचे सूप देत असते. परंतु यामुळे बाळाचे पूर्ण पोषण होत नाही. यासाठी बाळाचे आहारात बहुपयोगी पीठाचा वापर करून गोड लापशी करता येते.
नाचणीपासुन अनेक पौष्टीक पदार्थ कसे व कोणते ?
नक्कीच यावर एक लेख येइल …
नक्कीच यावर एक लेख येइल …
नाचणीचे उत्कृष्ट पदार्थ उपलब्ध करुन दिले जातील.
श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी
8668329202
9420054040
रत्नागिरी
8668329202
9420054040



