पिंपरी-चिंचवड, पुणे
हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने ५० लाख रूपयांचा सहाय्यता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये २० लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 , आरोग्य विभागास पाच लाख रूपयाचे पीपीइ किट व उपविभागीय अधिकारी पुणे शहर व तहसीलदार मुळशी यांच्याकडे पाच लाख रूपयांचे ८५० धान्य किट देण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयात धनादेश प्रधान करतेवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.


