shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेने काढले आदेशाचे परिपत्रक..!!


इंदापूर। प्रतिनिधी ( माधुरी चव्हाण):
देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना (COVID-१९) विषाणूचा संसर्ग वाढत आहे. राज्यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर ही शहरे अधिक प्रभावित होत असली तरी पुणे-सोलापूर शहराच्या सीमेवर असलेले इंदापूर शहर अजूनही स्थानिक प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे आजही कोरोनामुक्त आहे. मात्र राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी कोरोना (COVID-१९) चे वाढते रूग्ण वाढत आहेत. मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून संसर्गित व्यक्ती इंदापूर शहरामध्ये येण्याचे व त्यांचेपासून शहरातील नागरिकांना संसर्ग होण्याची दाट शक्यता लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियोजनाचा एक भाग म्हणून इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी काही महत्वाचे आदेश परिपत्रक काढून दिले आहेत.



मुंबई, पुणे व इतर शहरातून येणारे नागरिक, व्यावसायिक व व्यापारी तसेच अत्यावश्यक वस्तूंचा (भाजीपाला, भुसार, दुधाचे टॅम्पो) इतरत्र पुरवठा करणाऱ्यांचा इंदापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने अशा लोकांना शहरामध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्याच्या उद्देशाने हे आदेश देण्यात आले आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणते आदेश देण्यात आले आहेत?

१) शहरामध्ये एका ठिकाणी थांबून भाजीपाला विक्री करणेस प्रतिबंध करणेत आलेला आहे. मात्र नगरपरिषदेमार्फत देण्यात आलेल्या भाजीपाला विक्री परवानाधारकांमार्फत सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत घरपोच भाजीपाला विक्री करावयाची आहे.

२) नगरपरिषदेमार्फत किराणा विक्री करणेकरिता किराणा दुकानांना परवाने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यांचेमार्फत किराणा मालाची घरपोच सेवा देण्यात यावी.

३) मेडिकल दुकाने दुपारी १ वाजपर्यंत खुली राहतील तसेच अत्यावश्यक प्रसंगी २४x७ सेवा देण्यात येतील.

४) कृषी सेवा केंद्र आणि संलग्न आस्थापना ही एक दिवसाआड दुपारी १ वाजपर्यंतच खुली राहतील. (सोमवार, बुधवार, शुक्रवार) तसेच त्यांचेमार्फत घरपोच सेवा पुरवली जाईल.

५) गॅस एजन्सीची वाहने व संबंधित कर्मचारी यांना सकाळी व सायंकाळी दिलेल्या निर्धारित वेळेत इंदापूर नगरपरिषद हद्दीमध्ये प्रवेश देण्यात येईल.

६) याशिवाय इतर दुकाने, आस्थापना, व्यवसाय, पुढील आदेशापावेतो पूर्णतः बंद असतील.

७) सोनाई दूध डेअरी व टोलनाक्यावरील कर्मचारी यांना इंदापूर नगरपरिषद हद्दीमध्ये ये-जा करण्यास पायबंद घालण्यात येत आहे. सदर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःची राहण्याची व्यवस्था करावी.

८) याशिवाय मुंबई. पुणे व इतर कोरोना संसर्गित शहरातून येणाऱ्या नागरिकांना शहरामध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे.

९) बाहेरील शहरातील नागरिक इंदापूर शहरामध्ये त्यांचे नातेवाईक, मित्र,आप्तेष्ट यांचेकडे येणे, थांबणे पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत असून असा प्रकार आढळून आल्यास सर्व संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल.

१०) शहरामध्ये दुध विक्रेत्यांना केवळ सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत घरोघरी फिरून दूध विक्री करण्यास परवानगी असेल. एका ठिकाणी बसून दूध विक्री करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे.

११) पिठाची गिरणी, मिरची कांडप इत्यादी सेवा पुरवठा दुकाने दुपारी १.०० वाजेपर्यंत खुली असतील.


१२) दुपारी १ वाजल्यानंतर रस्त्यावर नागरिकांना फिरण्यास पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत असून असे फिरणाऱ्या नागरिकांविरूद्ध सक्त कारवाई करण्यात येईल.

१३) कोरोना (COVID-१९) संदर्भात काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका इ. व्यक्तींना वरील आदेशतून सूट देण्यात येत आहे.

वरील प्रमाणे आदेशाचे सक्तीने पालन तथा अंमलबजावणी व्हावी असेही यात म्हटले आहे.
close