shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाचा विचार करा अमलात आणा…..


आता थोडच राहिलय,
काही दिवसांपुर्वी एक कथा माझ्या वाचनात आली होती. मी ती एकदा नाही तर परत परत वाचली होती. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत शासनाचा आदेश पुर्ण पणे पाळुन मी घरातच आहे. गेल्या महिन्याभरात काम नसल्याने आणि वेळ जाण्याकरीता माझ्याकडे असलेल्या कथा लेख यांचे मी वाचन करत आहे व हिंदी इंग्रजी या भाषेतील लेख कथा ज्ञानवर्धक माहीती. मराठी मध्ये रुपांतरीत करुन दररोज सर्वाना वाचण्या करीता "शिर्डी एक्सप्रेस" मार्फत प्रसारीत करीत आहे.



इतक्या दिवसात प्रसार माध्यमांच्या बातम्या बघुन लॉकडाउन असतानाही जे घराबाहेर जात होते यांच्याबद्दल थोडी चिडही येत होती. कोणतेही कारण नसताना बाहेर जाउन प्रसंगी पोलीसांचा मार खाणारेही बघत होतो. परंतु असे असूनही भारताची सद्य स्थिती बाकीच्या देशांची स्थिती बघता बरीच मर्यादेत आहे अस म्हणता येइल. परवाच्या २० तारखेपासुन शासनाचे धोरण बदलुन थोडी शिथिलताही काही शहरात दिली गेली आहे. काही उद्योग व व्यापार सुरु करण्यास अनुमती दिली आहे. परंतु गेल्या दोन दिवसात बरेच नागरिक बाहेर पडु लागले आहेत. आपण गेले एक महिना आपण व्यवस्थीत राहिलो आहे आता फक्त काहीच दिवस आहेत. हे ही दिवस जातील व कोरोनाचे संकट टळेल. हत्ती गेला आणि शेपुटच राहिलय अस म्हटल तर वावगं होणार नाही. असाच संयम कायम ठेवल्यास आपण संकटावर मात करु. या अनुषंगाने माझ्या वाचनात आलेली एक कथा मराठी रुपांतरीत करुन आपणापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे.
अतिशय पराक्रमी अश्या राजाचे एक राज्य होते. राजा उत्तम पद्धतीने व सचोटीने राज्य करीत होता. राज्य त्याच्या ताब्यात येउनही बराच काळ लोटला होता. राजा आता वयोवृद्धही झाला होता. केसही पांढरे दिसायला लागले होते. इतर शेजारील राजांशी या राज्याचे संबंध अतिशय चांगले होते. आपलं वय झालं आहे हे त्याने ओळखल होतं आणि या निमित्ताने एक दिवस राजाने दरबारात एक उत्सव ठरविला. या उत्सवात त्याने त्याच्या गुरुंपासुन ते त्याच्या सर्व मित्राना खास माणसाना शेजारील राज्यांच्या राजाना मंत्री अमात्य आणि दरबारातील इतर सर्वाना त्याच प्रमाणे नगरातील प्रतिष्ठीत नगर वासियानाही बोलावले होते.

पंचपक्वान्नाचा भोजन सोहळा आयोजित केला होता. ठरल्या प्रमाणे सर्व जण उपस्थित झाले. राजाने सर्वांचे आदरातिथ्य करुन सर्वाना प्रेमाने भोजन समारंभात सहभागी होण्यास सांगितले. आग्रहाचे भोजन जेवुन सर्व जण दरबारात बसले. राजाने त्याच वेळी रात्रभर नृत्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे सर्वाना सांगितले. त्या आधी राजाने आपल्या गुरुंच्या समोर येत वंदन करत त्याना काही सुवर्ण मुद्रा व दागिने दिले. कार्यक्रमात खुष होवुन त्याना ते कलाकाराना देता येतील या उद्देशाने ते दिले होते. कार्यक्रमास प्रारंभ झाला. गायन नृत्य पेश होवु लागले. रात्रभर गायन व नृत्यामध्ये सर्व दंग होते खरे परंतु राजासह कोणासही कलाकारान्मधिल कोणालाच काही बक्षीस द्यावे असे वाटलेही नव्हते. पहाटेचा काल आला. त्या गयिकेच्या नर्तिकेचे लक्ष तीच्या तबला साथीदाराकडे गेले. तो काहीसा थकला होता व त्यास ग्लानी येत असलेल्याचे तिला जाणवले. त्याचे काही चुकले तर न जाणो राजा रागवेल व शिक्षा करेल या भितीने तिने त्या तबला साथीदारास शक्य होइल तशा खाणाखुणा करुन बघितल्या होत्या. पण त्यास त्याचा बोधच हित नव्हता. तो थोडा जास्त निद्रेच्या आधिन जाणार याची शक्यता आहे असे तिच्या ध्यानात येताच तीने या पुढे मी दोहा सादर करत असल्याचे जाहिर केले.

बहु बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई ।
एक पल के कारने, ना कलंक लग जाई ।

दोहा ऐकल्या नंतर प्रत्येक जण जरा धीरगंभिर होवून तो दोहा ऐकु लागला. फार उत्तम प्रकारे गायिकेने दोहा सादर केला. प्रत्येक जण खुश होवु लागला. सगळे जण खुश होत आहेत हे पाहिल्यावर राजा थोडा अचंबीतच झाला. त्याला कळेचना. रात्रभर म्हटलेल्या कोणत्याही गाण्याला एवढी दाद आली नव्हती एवढी दाद सर्वांकडुन मिळत होती. प्रत्येक कडव्यावर सगळे जण "बहोत खुब" अशी दाद देवु लागले. जसा दोहा संपला तत्क्षणी गुरुदेवांनी सगळ्या सोन्याच्या मोहोरा गायिकेला दिल्या. राजकुमाराने स्वत:च्या गळ्यातील सगळे अलंकार काढुन दिले. ऱाजकन्येने खुष होवुन रत्नहाराची जोडीच गायिकेच्या गळ्यात घातली. राणीने सोन्या व रत्नांचा पाच पदरी हार दिला. सगळे जण खुष झाले व प्रत्येक जण त्याच्याकडे असलेले सर्व काही देवु लागला . राजाला काहीच समजेना. तो पुर्णपणे अचंबीत झाला. रात्रभर एकाही गाण्याला नृत्त्याला काहीच कोणी बक्षिस दिले नाही व या एका गाण्यालाच का देत आहेत ?

राजा सिंहासनावरुन खाली उतरला व त्या गायिकेच्या समोर येवुन तो त्वेशाने व रागाने म्हणाला, "एका दोह्यात सर्वाना तु लुटुन टाकलस. तु नीच आहेस.तु अशी काय जादु केलीस की सर्वजण तुला एक दोहा ऐकल्यावर सगळं देवु लागले आहेत ? " हे ऐकल्यावर गुरु उठले व राजाजवळ येउन म्हणाले, " अरे हिला तु नीच म्हणु नकोस. आता तर ती माझीही गुरु झाली आहे. कारण हिने जो दोहा म्हटलाय त्याने माझे डोळे उघडले आहेत. दोह्यातुन ही मला सांगत होती की मी माझी सर्व आयुष्य जंगलामध्ये देवाची भक्ती करण्यात आणि तप करण्यात घालवले परंतु शेवटच्या आणि आत्ता नर्तकी चा मुजरा माझी संपूर्ण साधना जळून नष्ट करण्यात करतात मी चालू आहे हे राजन मी आता येथे क्षणभरही थांबू शकत नाही मी निघालो" असं म्हणून गुरुदेवांनी आपल्या कमांडो सहीत जंगलाच्या दिशेने अक्षरशः धावतच निघाले. तेवढ्यात राजकुमारी पुढे आली आणि म्हणाली "पिताजी मी आता मोठी झाली आहे. आपण माझ्या विवाहाबद्दल काहीच विचार करत नसल्याने आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले असल्यामुळे मी आज रात्री आपल्या दरबारातील एका साध्या शिपाया बरोबर पळून जायचा विचार केला होता. परंतु या नर्तकी ने माझे डोळे उघडले यादो ह्यातून तिने मला सांगितले घाई करु नकोस तुझा विवाह नक्कीच होईल तू तुझ्या राजघराण्याला कलंकित करण्याचे काम करू नकोस आणि तुझ्या वडिलांचे नाव खराब होईल असे काही करू नको पिताजी मी हा बेत रद्द केला आहे."

तेवढ्यात राजकुमार पुढे आला आणि राजाच्या पायावर डोके ठेवून त्याने नमस्कार केलां. बोलू लागला " पिताजी वृद्ध होत चालला आहात असे असतानाही तुम्ही अजूनही राज्य माझ्याकडे देत नसल्याने मी व दरबारातील काही शिपाई यांनी आपला खून करण्याचा बेत आज केला होता परंतु या नर्तकीच्या दोह्यात हिने मला समजावले राजपुत्रा अशी चूक कधीच करू नकोस. अरे आज नाहीतर उद्या हे राज्य तुलाच मिळणार आहे कशाला उगीच आपल्या पित्याच्या खुनाचा कलंक आपल्या डोक्यावर घेतो आहेस? धीर धर. जरा सबुरीने घे सर्व काही व्यवस्थित होईल"

हे सगळं राजा अवाक होऊन ऐकत होता. राजाच्या मनात एकदम वैराग्य उत्पन्न झालं. राजानेही लगेच आपला निर्णय घेतला. राजा म्हणाला " मीही आता माझे राज्य माझ्या मुलाच्या स्वाधीन करून पुन्हा एकदा तपश्चर्या करायला जंगलात जाऊ इच्छितो. राजाने लगेच आपल्या मुलीलाही दरबारात एवढे युवराज जमले आहेत त्यातील तुझ्यापासून तिचा युवराज निवडू शकतेस. राजकन्या वडिलांची आज्ञा लगेच पूर्ण केली आणि तिनेही तिच्या पसंतीच्या राजकुमाराला वरमाला अर्पण करून त्याच्या सोबत विवाह केला. राजाने सर्व राज्य राजकुमाराच्या स्वाधीन करून तोही जंगलात गुरूंच्या बरोबर निघून गेला.

हा सर्व घडलेला प्रकार नर्तकी उड्या डोळ्यांनीच बघत होती तिच्या मनात आलं की माझ्या एका दोह्याच्या गायनाने इतक्या लोकांनी आपला आयुष्य चांगलं बनवलं आणि आयुष्यातील चुका दुरुस्त करून ते चांगल्या मार्गाला लागले परंतु मी अजून सुधारले नाही आणि त्याच वेळी तिने ही निर्णय घेतला आज पासून मी हे सर्व बंद करून मीही वैराग्य स्वीकारेन.

"बहु बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई ।
एक पल के कारने, ना कलंक लग जाए ।"

मित्रहो ही कथा सांगण्याचा उद्देश असा की आज आपण दिनांक बावीस मार्च पासून सगळे घरात बसलो आहोत. गेल्या महिन्यापासून आपण जो संयम बाळगला आहे या संकटांना आपण तोंड दिला आहे त्यातून आपण मार्ग काढला आहे हे सर्व बघता अगदी अंतिम क्षणी एक छोटीशी आपली चूक आपल्या सर्वांना आणि सर्व समाजाला संकटात लुटण्या करता कारणीभूत ठरू नये तेव्हा इतके दिवस जसा संयम पाळला आहे तसा याहीपुढे आपण सर्वांनी संयम बाळगावा हीच सर्वांकडून अपेक्षा आहे. एका क्षणाच्या मोहाने आपण आपले आयुष्य फुकट घालवू नका तेव्हा

घरी रहा सुरक्षित रहा
संघर्ष करा
प्रत्येक बाबतीत विशेष काळजी घ्या
सावधानता बाळगा

श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी
9420054040
8668329202
close