दररोज येणाऱ्या करोना विषयी च्या बातम्या व त्या अनुषंगाने होणारे लाॅकडाऊन यांच्या मध्ये हेल्थकेअर प्रोफेशनर्स मात्र स्वत:च्याय जीवाची पर्वा न करता आलेल्या संकटात लोकांना गरजेच्या सेवा देत आहेत.यात डाॅक्टरांचा एका दिवसात २० ते ५० पेशंट बरोबर संपर्क येतो, त्यातील काही नंतर पाँझीटीव्ह केंस निघतात, नंतर नंबर लागतों तो त्यांच्या स्टाफचा त्यांना सुध्दा डाॅक्टरां ईतके पेशंट हाताळावे लागतात.परंतु पेशंट ची हिस्ट्रि व व लक्षणे विचारून घेताना त्यांना पेशंट च्या स्थितीचा अंदाज आलेला असतो व त्यानुसार ते दक्षता घेतात व स्टाफला सुध्दा तशा सुचना देतात, हा पेशंट पुढे औषधे घेण्यासाठी केमिस्ट शाँप मधे येतो, केमिस्ट बाकी गोष्टी काय झाल्यात या विषयी अनभिज्ञ असतो, आलेल्या पेशंट ला योग्य ती औषधे, योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या वेळी देण्याची त्यांची जबाबदारी असते, तो प्रिस्क्रिप्शन वर नजर टाकुन ते डिस्पेंन्स करायला घेतो,प्रिस्क्रिप्शन हाताळताना तो काही विशेष काळजी घेत नाही, दिवसात १०० ते ४०० पेशंट च्या हाताचा स्पर्श दरम्यान काऊंटरच्या टाँपवर (काचेवर) झालेला असतो,एखादी शिंक किंवा खोकल्याची ऊबळ येऊन गेलेली असते, त्यातूनच ईन्फेक्शन फैलाऊ शकते.
कम्युनिटी फार्मसी मध्ये तर फार्मसिस्ट भोवती ग्राहकांचा गराडा असतो,कुणाला सॅनिटायझर हवा असतो, कुणाला मास्क हवा असतो कुणाला हॅन्ड वाॅश, या सर्व गोष्टी देताना स्वत:चा मास्क सांभाळणं त्याला अवघड होते.व इतक्या लोकांशी संवाद साधताना मास्क ची अढचण होते, मग हा पठ्ठया तसाच ढाल तुटलेल्या लढवय्या सारखा लढत रहातो व लढत राहणार आहे पण एक खंत मनात घेऊन.
ऊद्या एखाद्या कम्यूनिटी फार्मसिस्ट चा रिपोर्ट पाॅझीटीव्ह आला तर त्याच्या बाजूला कोण उभे राहणार आहे, लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन,आॅनलाईन बरोबर स्पर्धा करत असताना १०% डिस्काउंट देऊन बेजार झालेला, कोठेतरी दुसऱ्या एखाद्या अपप्रवृत्ती ने जास्त रेटने वस्तु विकल्या मुळे मिडियाच्या कृपेने सर्वत्र विनाकारण बदनाम झालेला केमिस्ट विचार करतोय की आपण पाॅझीटीव निघालो तर आपली फार्मसी बंद राहील, आपल्या नंतर आपल्या कर्जाचे हप्ते कोण भरणार, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार कोण लावणार.
हे कटू पण वास्तव आहे, सरकारी कर्मचारी आजारी पडला तर त्याच्या उपचारांचा वाटा सरकार उचलते ,डाॅक्टर नर्स यांची जबाबदारी संबंधित हाॅस्पीटल घेते परंतु इतके वर्ष ईमानदारी ने टॅक्स भरणारा केमिस्ट आजारी पडला किंवा दगावला तर त्याची साधी आस्थेने चौकशी सुध्दा सरकार कडुन होते का, ऊद्या यातील कुणी फार्मसिस्ट बाबतीत वाईट घटना घडली तर सरकार त्याला काय मदत करणार,स्वाईन फ्ल्यू साथीच्या वेळी असाच एक फार्मसिस्ट चा बळी गेला आहे. काही कारणांमुळे एखाद्या महिन्यात वॅट भरायचा राहीला तर रोजचा दंड आकारण्यात येतो.मग अशा प्रसंगी केमिस्ट ला कर्जमाफी मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळणार का हा खरा प्रश्न आहे.
तरीही फार्मसीचे शिक्षण घेत असताना झालेले संस्कार व सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर कम्युनिटी फार्मसीस्ट काम करत आहेत.आॅनलाईन वर स्वस्त औषध मिळतात म्हणून फार्मसिस्ट ला हीनवणारे लोक सुध्दा या संकटाच्या वेळी कम्युनिटी फार्मसी हीच चांगली आहे हे मान्य करतात....
"एक व्यथीत फार्मसिस्ट "


