राहुरी - दि. 08
अहमदनगर च्या प्रशिक्षनार्थी जिल्हाधिकारी तसेच राहुरी चे तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष अरुणराव तनपुरे, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, अधिकारी डुकरे साहेब व जरे साहेब, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, कांदा आडत व्यापारी, हमाल, मापाडी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे आज सकाळी 11.00 वाजता झालेल्या बैठकीत राहुरी येथील कांदा मार्केट 15 मे पासून सुरू करण्याचा निर्णय झाला.
श्रीरामपूर, राहता व अहमदनगर येथील बाजार समिती प्रमाणे राहुरी मधे सुद्धा गरजू शेतकार्यांसाठी कांदा खरेदी सुरू करावी म्हणून देवळाली प्रवरा येथील शेतकरी तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना ई मेल द्वारा पत्र लिहून मागणी केली होती. त्या अनुषंगाने राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष अरुणराव तनपुरे साहेब यांनी आज वरील मान्यवरांच्या उपस्थितीत विचार विनिमय करुन निर्णय घेणेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. काही नियम तयार करुन राहुरी येथील कांदा मार्केट दि. 15 मे पासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेणेत आला. त्यासाठीची नियमावली बाजार समिती च्या वतीने लवकरच जाहिर करण्यात येईल. व त्या नियमावली नुसारच राहुरी तालुक्यातील गरजू शेतकरी बांधवांना आपला कांदा येथे विकता येणार आहे.
या सभेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष अरुणराव तनपुरे साहेब, तहसिलदार फसियोद्दीन शेख साहेब, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, आडत व्यापारी आदिनी चर्चेत सहभाग घेतला. सकाळी 11 ते दु. 02 वाजेपर्यंत असी तब्बल तिन तास सुरू असलेल्या या सभेत सखोल चर्चेनंतर अखेर राहुरी येथील कांदा मार्केट 15 मे पासून सुरू करण्याचा एक मुखी निर्णय घेतल्याबद्दल आप्पासाहेब ढुस यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
तसेच राहुरी चे तहशीलदारसाहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हे कांदा खरेदी साठी जे नियम घालुन देतील त्याची तंतोतंत आंबलबजावनी शेतकरी बांधवांनी करावी व त्या नियमाचे अधिन राहूनच कांदा मार्केट मधे पाठवावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी राहुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना केले आहे.