सावळीविहीर। राजकुमार गडकरी :
राहाता तालुक्यातून कोरोना संशयित व लक्षणे आढळणाऱ्या एकूण 160 व्यक्तींचे स्राव नमुने आतापर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.या 160 पैकी 159 व्यक्ती कोरोना निगेटिव निघाल्या असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता.परंतु त्यावर शिर्डी येथे त्याचवेळी योग्य औषध उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला असून त्याला दिड महिन्यापूर्वीच घरी सोडण्यात आले असून राहता तालुका आतापर्यंत कोरोना मुक्त असल्याची तसेच राहता तालुक्यातून लॉकडाउनच्या काळात आत्तापर्यंत 6066 व्यक्तींना परजिल्ह्यात ,परराज्यात विविध बस व रेल्वेने सोडण्यात आल्याची माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात, राज्यात विविध उपाय योजना व कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व कामकाज ठप्प झाले होते.लॉकडाऊन च्या काळात परराज्याततील कामगार तसेच गोरगरीब व्यक्तींसाठी साई पालखी निवारा निघोज येथे व्यवस्था करण्यात आली होती .142 लोक येथे होते. त्यांना चहा, नाश्ता, जेवण साईसंस्थान देत होते व त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यात येत होती , त्यानंतर त्यांना आपापल्या ठिकाणी पाठवण्यात आले तसेच शिर्डी येथे साई संस्थानच्या साईआश्रम फेज २ मध्ये विशेष विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला होता , राहता तालुक्यातील सर्व सरकारी व साई संस्थान हॉस्पिटल, प्रवरा हॉस्पिटल यामध्येही व्यवस्था करण्यात आली, लॉक डाऊनच्या नियमाची राहता तालुक्यात कडक अमल बजावणी करण्यात येत होती व सध्या करण्यात येत आहे , सध्या तालुक्यातील प्रत्येक गावात शाळाखोल्या ताब्यात घेण्यात आले असून येथे बाहेरगावाहून आलेल्या लोकांचे आरोग्य तपासणी करून त्यांना या शाळांमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे,
तालुक्यात सर्व ती दक्षता घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राहता तालुक्यात अडकलेले किंवा आपल्या राज्यात जाणाऱ्यांना राहता प्रशासनाने वेळीच अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशान्वये सर्व उपाययोजना करून या राहाता तालुक्यातील सुमारे 6066 व्यक्तींना त्यांची आरोग्य तपासणी करून तसेच लॉक डाऊनचे नियम पाळत मास्क व सोशल डिस्टंन्स ठेवत विविध ठिकाणाहून त्यांच्या सोयीनुसार बसने, रेल्वेने आपापल्या जिल्ह्यात, परराज्यात त्यांना सुखरूप पणे पाठवण्यात आले आहे. राहता तालुक्यातून 6 मे ते 22 मे या दरम्यान 18 खाजगी वाहनातून राजस्थान ,मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात, ओरिसा ,पश्चिम बंगाल या राज्यातील 261 परप्रांतीयांना पाठवण्यात आले होते, तर राज्य महामंडळाच्या एसटी बसने 13 मे ते 21 मे या दरम्यान शिर्डीहून एकूण बारा एस टी बसने 280 परप्रांतीयांना बिलासपुर ,खांडवा सागर ,बालाघाट व मध्य प्रदेश मध्ये पाठवण्यात आले तर 7 मे ते 13 मे दरम्यान निर्मळ पिंपरी वरून एक, वाकडी वरून एक, राहत्या वरून तीन व शिर्डीहून एक अशा सहा एसटी बसने 63 व्यक्तींना राज्यातीलच नाशिक, धुळे ,जळगाव ,अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यात पाठवण्यात आले ,एसटीने व खाजगी वाहनातून राहत्या मधून सुमारे 604 व्यक्तींना परजिल्ह्यात ,परराज्यात सोडण्यात आले तर परराज्यात जाणाऱ्या दुरच्या परप्रांतीयांसाठी शिर्डी साईनगर रेल्वेस्थानका मधूनही विशेष श्रमिक 5 रेल्वे सोडण्यात आल्या होत्या 6 मेला उत्तर प्रदेश मधील सीतापुर साठी रेल्वेने एकूण 12 51 प्रवाशांना पाठवण्यात आले तसेच सीतापुर साठीच 1404 परप्रांतीयांना पाठवण्यात आले होते, 12 मे रोजी शिर्डी साईनगर येथून श्रमिक रेल्वेने 1559 तर 16 मेला 463 परप्रांतीयांना पाठवण्यात आले. 21 मेला साईनगर शिर्डी रेल्वेस्थानका मधून 785 परप्रांतीयांना दरभंगा साठी येथून सुखरूपपणे रवाना करण्यात आले.असे एकूण 5 रेल्वेमधून 5465 परप्रांतीयांना आपल्या राज्यात पाठवण्यात आले आहे, राहाता तालुक्यातून खासगी व सरकारी बसने 604 तर रेल्वेने 5462 अशा एकूण 6066 व्यक्तींना परजिल्ह्यात परराज्यात सुखरूपपणे सोडण्यात आले. या सर्वांची ,रहिवासी दाखला तसेच त्यांचे आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र, मास्क व सोशल डिस्टंन्स पाळून सुखरूपपणे त्यांना आपापल्या जिल्ह्यात, राज्यात पाठवण्यात आले.अशी माहिती देत तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले की ,राहता तालुक्यात एकूण 160 संशयित व लक्षणे वाटणाऱ्या कोरोना ग्रस्त व्यक्तींचे स्राव नमुने तपासणीसाठी आत्तापर्यंत पाठवण्यात आले होते त्यामध्ये 159 व्यक्ती निगेटिव्ह निघाल्या होत्या, एक व्यक्ती पॉझिटिव आली होती. तिला शिर्डी येथे औषध उपचार केल्यानंतर दीड महिन्यापूर्वी पूर्णपणे बरा झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, त्यामुळे राहता तालुका अद्यापपर्यंत तरी कोरोना मुक्त आहे.असाच पुढे तो कोरोना मुक्त राहावा यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच राहता तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, आरोग्य, पोलीस, स्वच्छता, बस, रेल्वे प्रशासन, विविध शासकीय कर्मचारी आपापल्या परीने अहोरात्र परिश्रम घेत आहेत असे तहसीलदार हिरे यांनी सांगितले.

