हिंगोली दि.२८( प्रतिनिधी)
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावा दरम्यान मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागु असलेल्या लाॅकडाऊन दरम्यान कळमनुरी तालुक्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि.२८मे गुरूवार रोजी चार ट्रॅक्टर अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना पकडले असुन चार ट्रॅक्टर वाळु सह जप्त करून ८ व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन २३ लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळु माफीयांत एकच खळबळ उडाली आहे.
लाॅकडाऊन काळात हिंगोली जिल्ह्यात वाळुमाफीयांकडुन अवैध वाळु चोरून विक्री करण्याचे वाढते प्रमाण पाहाता हिंगोली जिल्हा पोलीस अधिक्षक मा.योगेश कुमार यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळुची होत असलेली चोरटी वाहतुक करणा-या विरोधात मोहीम राबविण्यात आली असुन दि.२८ मे गुरूवार रोजी सदर पथकाला मिळालेल्या माहीतीव्दारे वाळुची चोरटी वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर,चार चालक तसेच चार वाहन मालकावर कळमनुरी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण २२ लाख ९७ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही मध्ये कळमनुरी हद्दीतील कळमनुरी ते खानापुर जाणा-या रोडवर शिवपार्वती धाबा ते लासीना पाटी या भागात अवैधपणे वाळु गौण खनिजाची विना परवाना चोरटी विक्रीकामी वाहतुक करत असतांना १)चालक डिगांबर ग्यानदेव गंगावणे रा.खेड ता.कळमनुरी जि.हिंगोली वाळु व ट्रॅक्टर मालक भरत गणेशराव नागरे रा.खेड ता.कळमनुरी २)चालक सुधिर गुलाबराव इंगळे रा.टाकळी ता.कळमनुरी व ट्रॅक्टर मालक आकाश जगन कांदे रा.खेड ता.कळमनुरी ३)चालक बाळु उर्फ विश्वजीत पाईकराव रा.टाकळी ता.कळमनुरी ट्रॅक्टर मालक महादेव लिंबाजी कांदे रा.खेड ता.कळमनुरी ४)चालक ज्ञानेश्वर आश्रुबा गोरे या.खेड ता.कळमनुरी,ट्रॅक्टर मालक पंजाब दत्तराव गिते या.खेड ता.कळमनुरी यांच्या ताब्यातुन ३.५ ब्रास वाळु किंमत १७हजार ५०० रूपये व गुन्ह्यात वापरलेले ४ट्रॅक्टर,४ट्राॅलीसह एकुण किंमत २२लाख ४०हजार रूपये एकुण २२लाख ९७ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक योगेश कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार,पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे उपनिरीक्षक पोटे,बालाजी बोके,शंकर जाधव,सुदाम लकुळे,भगवान आडे,सुनिल अंभोरे,किशोर कातकडे,राजु ठाकुर,शंकर ठोंबरे,किशोर सावंत,दिपक पाटिल,विठ्ठल काळे,चालक पोलीस शिपाई वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.अशीच कार्यवाही हिंगोली शहरालगत असलेल्या आकोला बायपास परिसरातील व सेनगांव तालुक्यातील वाळुमाफीयांवर देखील व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरीकातुन होत आहे.


