shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. गजानन पायघन यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त गरजू निराधार 50 कुटुंबांना केले अन्नधान्य किटचे वाटप

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.27, हिंगोली जिल्ह्यातील  सेनगाव शहरातील सरस्वती हॉस्पिटल चे संचालक डॉ. गजानन कृष्णाजी पायघन व डॉ. सौ. सरोज गजानन पायघन यांनी आपला मुलगा जयश च्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब गरजू निराधार 50  कुटुंबियांना अन्नधान्याच्या किटचे मोफत वाटप केले आहे.



कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊन मुळे गरीब निराधार लोकांना कुठे काम मिळत नाही परिणामी पैशाच्या अभावामुळे ते काही विकत घेऊ शकत नाहीत व तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशातच डॉ. पायघन यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता गोरगरीब निराधार व्यक्तींसाठी 50 कीट तयार केल्या त्यामध्ये पाच किलो गहू, एक किलो तांदूळ, साखर,चाहापत्ती, साबण इत्यादी वस्तूंचे किट त्यांनी वाटप केले त्यामुळे निराधार लोकांची  काही दिवस का होईना पण उपासमार टळली त्यामुळे निराधार लोकातून डॉ.पायघन कुटुंबीयांचे समाधान व्यक्त होत आहे.



या किट वाटपाच्या वेळी सेनगांव नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे,हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,नगरसेवक उमेश देशमुख, उपनगराध्यक्ष प्रवीण महाजन,पत्रकार जगन्नाथ पुरी, जगन वाढेकर,गजानन वाणी आदी उपस्थित होते.
close