shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोसरीत भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप

पिंपरी-चिंचवड:- ‘कोरोना’ व्हायरसने महाराष्ट्रात हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराच्या कोरोना विषाणूने जनतेला हैराण करून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनासह, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवरही सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येत आहे.

आज भोसरी येथे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. त्यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक अभिमन्यू (आबा) लांडगे उपस्थित होते.
close