shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील ग्रामिण भाग धोकादायक वळणावर..!!



दि.18/05/2020
हिंगोली।प्रतिनिधी:- गजानन गिरे गोरेगावकर
सेनगाव तालुक्या सह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुंबई ,पुणे ,औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेल्या मजुरांचे हजारोंच्या संख्येने जथेच्या जथे परत येत आहेत परत येताना सदरील मजूर वैद्यकीय प्रमाणपत्र आणत असले तरी यातील बहुतेक ग्रामस्थ होम काँरटईन चे नियम पाळत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेची चिंता वाढली आहे गोरेगाव व परिसरातील परतलेले मजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी करून 14 दिवस होम काँरंटाईन राहण्याचे अपेक्षित असले तरी सर्वच लोक बिनदिक्कत सर्वत्र फिरत असल्याने संपूर्ण ग्रामीण भाग धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे काल वसमत येथे मुंबई वरुन आलेले आठ मजुर पाँझीटीव्ह निघाले आहेत. त्या अनुषंगाने हिंगोली चे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साहेबांच्या आदेशाने नुकतेच गोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधीनगर गोरेगाव येथे मुंबई-पुणे औरंगाबाद सारख्या हॉट स्पॉट शहरातून येणाऱ्या व होम काँरंटाईन टाइनचे नियम पाळत नसणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या हेतूने नुकतीच पाहणी करण्यात आली सदरील विलगीकरण कक्षात 14 दिवस ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यात येत आहे. सदरील विलगीकरण कक्षाची पाहणी करताना सोसायटीचे चेअरमन तथा सरपंच पती श्री भास्करराव पाटील , गोरेगाव सज्जाचे तलाठी श्री विजय येल्लारे साहेब, ग्राम विकास अधिकारी श्री इंगोले साहेब, गावातील प्रतिष्ठित श्री शिवाजी पाटील , पोलीस पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
close