shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेकिंगसाठी थांबविले म्हणून पोलिसांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण; बोपखेल फाटा येथील घटना

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- लॉकाऊनमध्ये पोलिसांवर होणार्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. बोपखेल फाटा येथील चेक नाक्यावर चेकिंगसाठी कार थांबविली म्हणून कारचालकाने पोलीसांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी (दि.१०) घडला आहे.


महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय व्यंकटेश कामठे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्व प्रकारे खबरदारी घेत आहे. फिर्यादी पोलीस हवालदार कामठे हे बोपखेल फाटा चेक नाक्यावर रविवारी कार्यरत होते. रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. आरोपी त्याच्या कारमधून जात असताना कामठे यांनी आरोपीची कार चेक नाक्यावर थांबवली. कार थांबवल्याचा राग आल्याने आरोपीने पोलीस कर्मचारी कामठे यांच्या कानशिलात लगावली. काहीही करण नसताना कामठे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांच्याशी आरोपीने भांडण केले. पोलीस कॉन्टेबल जाधव यांना दगड फेकून मारला. आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली.

पोलीस करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. त्यामुळे दिघी पोलीस आरोपीला त्यांच्या व्हॅनमधून दिघी पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान देखीेल केले. पोलिसांनी आरोपी वाघमारे याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत
close