shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मागेल त्याला शेत तळे योजना सुरु ठेवा - आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा - दि. 23 
मा. आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी मागेल त्याला शेत तळे योजने अंतर्गत या पुढे नविन कामे सुरु न करने बाबद पारित केलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी  व मागेल त्याला शेत तळे योजना सुरु ठेवून त्याची अनुदान मर्यादा दुप्पट करावी असी मागणी देवळाली प्रवरा येथील शेतकरी तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडे दि. 23 मे 2020 रोजी सायं. 06.40 वा.ई मेल द्वारे पाठविलेल्या पत्रात केले आहे. या पत्रात आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे की,  कमीत कमी पाण्या मध्ये जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येवुन राज्यातील शेतीचे उत्पन्न वाढीसाठी व शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने सन 2016-17 पासून मागेल त्याला शेत तळे योजना सुरु केली आहे.  



या योजने मुळे अहमदनगर जिल्ह्यात सन 2016-17 पासून ते सन 2019-20 अखेर जवळपास 14 हजार शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने ही योजना राबविण्यात अहमदनगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. परिणामी ईतर जिल्ह्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले. मात्र.. , मा. आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी मागेल त्याला शेत तळे योजने अंतर्गत या पुढे नविन कामे सुरु न करने बाबद सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना जा. क्र. /मृदस/शे.कक्ष/01/456(र)2020 मृद संधारन व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन/कृषी आयुक्तालय/म.रा./ पुणे /01 दि. 06/05/2020 या पत्रान्वये कळवून या योजनेला स्थगिती दिली आहे. त्यामूळे राज्यातील शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष पसरला आहे. 

मागेल त्याला शेत तळे योजने अंतर्गत शेतकार्यांना 50 हजार रुपये नाम मात्र अनुदान मिळत होते. तथापी शेतात मुरूम व दगड लागला तर शेत तळ्याला जवळपास दोन लाख रुपये वास्तव खर्च येतो. त्यामूळे या योजनेत तुटपुंज्या अनुदानावर समाधानी असलेला शेतकरी वरील संधर्भीय पत्राने हवालदील झाला आहे.  NHF योजने अंतर्गत घेतलेल्या शेत तळ्यांचे अनुदानही अजुन पर्यंत सर्व शेतकर्यांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळेही राज्यातील बहुतांश शेतकरी अडचणीत सापडला असलेने पाउस सुरु होणे पुर्वी  शेत तळ्यांचे उर्वरितसर्व अनुदान तात्काळ शेतकर्यांना वर्ग होणे आवश्यक आहे. जेणे करून शेत तळ्यांचे अपूर्ण कामे पावसाळ्या पुर्वी पुर्ण करता येतील. 
      
मागेल त्याला शेत तळे योजने अंतर्गत  एकिकडे  शेत तळ्यांना आस्तरी करनासाठी निधी कमी पडत असताना दुसरीकडे  संधर्भीय आदेश काढुन सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळन्याचे काम केले असल्याची प्रतिक्रीया शेतकरी बांधव बोलून दाखवत असल्याने कृपया आस्तरिकरन करण्यासाठी निधी वाढवून मिळावा असी शेतकर्यांची माफक अपेक्षा आहे. 
     
तरी अपणास विनंती की, राज्यातील शेतकर्यांची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन  मागेल त्याला शेत तळे योजने बाबत मा. आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी मागेल त्याला शेत तळे योजने अंतर्गत या पुढे नविन कामे सुरु न करने बाबद पारित केलेल्या संदर्भीय आदेशाला स्थगिती द्यावी. व मागेल त्याला शेत तळे योजना सुरु ठेवून त्याची अनुदान मर्यादा दुप्पट करावी. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करने कामी संबंधीत विभागाला तात्काळ योग्य ते आदेश द्यावेत  असी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.
close