अहमदनगर दि.21- शिकाऊ उमेदवारी योजना अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ही पुढे ढकलण्यांत आलेली आहे. ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर भरण्यात यावी. सदर परीक्षा अर्ज भरण्यासाठी उमेदवार आयटीआय पास असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांने परीक्षा अर्जाची प्रिंट व परीक्षा फ्री ऑनलाईन पध्दतीने आयटीआयच्या आस्थापनास जमा करावी. तसेच अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगाव रोड, अहमदनगर (दूरध्वनी क्रमांक 0241-2328013) येथे संपर्क साधावा. असे मुलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


