shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विजेच्या खोळंब्याने मुलांच्या ऑनलाइन शिक्षणावर पाणी- आप्पासाहेब ढुस

कोरोना मुळे सध्या राज्यातील सर्व शिक्षण व्यवस्था ठप्प आहे. म्हणून शासनाकडून मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्या दूरदर्शन या TV चॅनलवर पहिली ते 12 वी पर्यंतच्या  अभ्यासक्रमावर कार्यक्रम चालू आहे. त्या कार्यक्रमांची वेळ सकाळी १०:३० ते ११  इयत्ता पहिली ते पाचवी, ११ ते १२  इ.६ वी ते ९ वी व ११वी. १ ते २ इ.१० वी व १२ वी असे गत तिन दिवसापासून सदर प्रोग्राम TV वर चालू आहेत.  



मात्र सदर कार्यक्रमा दरम्यान देवळाली प्रवरा परिसरात व इतरत्रही  काही ठिकाणी रोज लाइट जात असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामूळे महवितरण ने या प्रश्नी लक्ष घालुन पुर्ण वेळ विज उपलब्ध राहिल या कामी सहकार्य करावे व मुलांचे शैक्षणीक नुकसान टाळावे अशी विनंती आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा यांनी केलेली आहे. तरी महावितरण ने याकामी वेळीच दखल घेतल्यास नागरिकही धन्यवाद देतील यात शंकाच नाही.
close