shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील धोतरा येथे लाईटच्या शॉटसर्किट मुळे घराला लागली आग

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.25 मे,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धोतरा येथे दि .24/05/2020 रोजी दुपारी दोन वाजता लाईट च्या शॉट सर्किट मुळे नागोराव ग्यानबाराव थिटे यांच्या घराला आग लागली यात त्यांचे जिवनावश्यक साहित्य जळून खाक झाले आहे. यामधे घरातील धान्य साठ्यासह टी व्हि,कपडे तसेंच शेती साठी लागणारे फवारणी पंप असे अंदाजे त्यांचे पंचविस ते तिस हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले आहे तरी सर्व नुकसान भरपाई प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी नागोराव थिटे हे करीत आहेत मात्र यामध्ये काही जीवित हानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. 



सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा धोतरा सह आदी गावामध्ये विद्यूत प्रवाह करणाऱ्या तारा लोंबकळत आहेत मात्र महावितरणचे अधिकारी याकड़े दुर्लक्ष करीत आहेत नेहमीच स्पार्कींग होऊन विद्यूत पुरवठा खंडीत होतो यांची कल्पना उप कार्यकारी अभियंता वडगावकर साहेब यांना गावक-यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले मात्र अद्याप हि कोणतेही काम केले  वार वार सांगून सुध्दा कोणतेच काम केले जात नाही या मुळे कोणाचा जीव गेल्या वर महावितरणच्या अधिकाऱ्याना जाग येणार का? तरी महावितरणच्या वरीष्ठ अधिका-यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन पावसाळा सुरू होण्यापुर्वी सेनगांव तालुक्यातील ग्रामिण भागातील लोंबकळत असलेल्या विज वाहीन्या त्वरीत दुरूस्ती कराव्यात अशी मागणी सुज्ञ नागरीकातुन होत आहे.
close