shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधरण सभे शिवाय लाभांश वाटपास मंजूरी मिळावी - आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा - 
कोरोना च्या आपत्ती मुळे राज्यातील  सहकारी संस्था च्या वार्षिक सर्वसाधरण सभा भरविणे शक्य नसल्याने खास बाब म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभे शिवाय सहकारी संस्थांचा लाभांश वाटपास मंजूरी  मिळावी म्हणून देवळाली प्रवरा येथील सहकारी संस्थेचे सभासद व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दि. 24 मे 2020 रोजी रात्री 09.35 वा. ई मेल द्वारा पाठविलेल्या पत्रात विनंती केली आहे. 
     
ढुस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात सहकारी संस्थाचे मोठे जाळे आहे. शेतकरी/व्यावसायिक /नोकरदार या सर्वांचे अर्थचक्र सहकारी संस्थेमार्फत जास्त चालते.  मार्च अखेर सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष पुर्ण होवून गेले आहे. सभासदांना चालु वर्षाच्या नफा वाटणीतुन "लाभांश " देणेसाठी वार्षिक - सर्वसाधारण सभेच्या मंजूरीची आवश्यकता लागते. मात्र सध्या कोरोना आपत्तीमूळे लाभांश वाटपासाठीची  "विशेष सर्वसाधारण सभा व वार्षिक- सर्वसाधारण सभा" घेणे सहकारी संस्थांना शक्य नाही. त्यामूळे खास बाब म्हणून या सभांचे अधिकार चालू आर्थिक वर्षाकरीता संचालक मंडळाच्या मासिक बैठकिस देणेचे आदेश दिल्यास या संस्थांचा लाभांश वाटप व इतर कामकाज सुरळीत होणेसाठी मोठी मदत होनार आहे. 


     
सध्या कोरोना च्या आपत्ती मुळे राज्यात अजुन बरेच दिवस सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा भरविणे शक्य होईल असे वाटत नाही. आणि अश्या वार्षिक सर्वसाधारण सभा भरविता न आल्याने या सर्व सहकारी संस्थांचा लाभांश वाटप लांबणीवर पडणार आहे. आणि जर खास बाब म्हणून आपण सहकारी संस्थाच्या वार्षिक सर्वसाधरण सभे शिवाय लाभांश वाटपास मंजूरी दिली तर कोरोना बंद मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सभासदाला मोठा आर्थिक दिलासा मिळेल व बाजारपेठेत करोडो रुपयांची उलाढाल होण्यास त्यामूळे मदत होईल, आणि हे सर्व करण्यासाठी राज्य सरकारला कोणतीही वेगळी आर्थिक तरतूद करावी लागणार नाही किंवा राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही वेगळा आर्थिक भार यामुळे पडणार नाही. 
      
तरी त्यांनी ईमेलव्दारे मा.मुख्यमंत्री यांना नम्र विनंती केली आहे की, राज्यातील  सहकारी संस्था च्या वार्षिक सर्वसाधरण सभे शिवाय लाभांश वाटपास मंजूरी देणे कामी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळास खास बाब म्हणून अधिकार प्रदान करणेसाठी  आवश्यक ती तातडीची  उपाययोजना करणे कामी संबंधीत विभागाला तात्काळ योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी करुन हा प्रश्न मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब लवकरच मार्गी लावतील असा विस्वास व्यक्त केला.



close