shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिलेखनवाडीत गरजुंना अन्नधान्याचे वाटप..!!


> शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे खंदे समर्थक तुकाराम गुंजाळ मित्रमंडळ व सामाजिक संघटनांचा उपक्रम..!!

चिलेखनवाडी (नेवासा)।प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडीत माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांनी सरपंच असताना अनेक गोरगरिबांच्या कामांना अधिक प्राधान्य देत कामे करत राहिले, त्यांच्या कामांचा ठसा आजही प्रकर्षाने पहायला मिळते.गोर गरिबांचे कैवारी म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.
       
मा.श्री.शंकरराव गडाख व मा.श्री.तुकाराम गुंजाळ

सध्या कोरोना वैश्विक महामारीने जगभर थैमान घातले असून लाॅकडाऊन ३ रा टप्पा चालू आहे.यामुळे अनेकांची उपासमार होत आहे, आपण समाजाचे काहितरी देणे लागतो,या उदात्त हेतूने  मा.सरपंच तुकाराम गुंजाळ मित्र मंडळाच्यावतीने विधवा,अपंग,बेरोजगार,भुमिहिन व निराधार गरिब २०० कुटुंबांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.१०क्विंटल गहु,दोन क्विंटल साखर,१०० किलो गोडतेल व २००हुन अधिक चहापावडर पुड्यांचा वाटप सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आले.

मजुरांची संख्या सर्वाधिक असलेल्या चिलेखनवाडीत लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणार्यांना काम नसलेने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हा गोर गरिबांचा प्रश्न माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांना सतत बेडसावत असल्याने त्यांनी मित्रमंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला.

प्रा.लक्ष्मण लोखंडे

माजी सरपंच तुकाराम गुंजाळ,सेवा संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती वाघमोडे,प्रा.लक्ष्मण लोखंडे,रोहिदास गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य नामदेव वाघमोडे,लता कांबळे आदींनी गावातील गरजुंसाठी सहकार्याची हाक देताच अनेकांचे हात मदतीसाठी सरसावले आणि वरीलप्रमाणे मदत जमा झाली.त्यानंतर गरजवंताचे निकष ठरवण्यात आले.एकनाथ गुंजाळ,पंढरीनाथ गुंजाळ,राहुल जावळे,मुसा इनामदार,राजेंद्र बागडे,मुख्याध्यापक सुरेश सानप,अर्जुन गाडेकर,कैलास काळे,जालींदर खानोरे,शिवाजी भातांबरे,बाळासाहेब दुकळे,बाबासाहेब भातांबरे,पांडु जाधव,नंदकुमार कांबळे,विठ्ठल धोत्रे,पप्पुदादा गुंजाळ,झेंडु पवार,ज्ञानदेव चव्हाण,सुभाष पवार,साहेबराव भातांबरे,विठ्ठल पवार,नितीन गुंजाळ,गणेश भातांबरे,किरण गुंजाळ,नितीन पवार,राजू पवार,बारकू पवार आदिंनी यावेळी मदत केली. गरजूंसाठी हा उपक्रम राबविल्यामुळे माजी सरपंच तुकाराम गुंजाळ व मित्र मंडळाचे सर्वत्र अभिनंदन व कौतूक होत आहे.
close