shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली | अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. त्या पॅकेजची सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देत आहेत. यावेळी त्यांनी 15 हजारापेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.


15 हजारहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 24 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 15 हजारहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा EPFO सरकारद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा सीतारमन यांनी केली आहे.

ईपीएफचे 24 टक्के योगदान आता फक्त मे नाही तर आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

close