shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमचे विनंतीस मान देऊन पार्सल पध्दतिने दारु विक्रीस परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हार्दिक आभार.. - आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा

देवळाली प्रवरा - दि. 20 मे 2020
सरकारने राज्यातील बार/परमिट रूम मध्ये पार्सल पध्दतिने दारु विक्रीस परवानगी द्यावी व कमी गर्दीत महसूल वृद्धी सधावी असी मागणी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना दि. 5 मे रोजी दू. 01.40 वा.  ई मेल द्वारा पाठविलेल्या पत्रात विनंती केली होती. 



ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हंटले होते की, कोरोनाचे पार्श्वभूमीवर खास जनतेच्या आग्रहस्तव व राज्याच्या महसुलात भर पडावी म्हणून राज्य सरकारने राज्यात वाइन शॉप उघडण्यास परवानगी दिली. तथापी राज्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या वाइन शॉप ची अपुरी संख्या पाहता प्रत्येक वाइन शॉप समोर कित्येक किलोमीटर लांब पर्यंत वाइन खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत आहे. व त्यामूळे सुरक्षित अंतराचा नियम मोडला जावुन कोरोनाचे संकट व त्याची भिती वाढू लागली आहे. म्हणून मी स्वताः जरी निर्व्यसनी असलो तरी कोरोनाच्या संकटा पासून जनतेला वाचविण्यासाठी आणी राज्याच्या महसुलात भर घालण्यासाठी अश्या दोन्ही उद्देश्याने नाविलाजास्तव अपणनास मी याविषयी विनंती वजा सुचना करीत आहे. 

म्हणून सरकारने जर वाइन शॉप व्यतिरिक्त जर  बार/परमिट रूम मध्ये सुद्धा पार्सल पध्दतिने दारु विक्रीस परवानगी दिली तर सरकारचा प्रतीदीन काही कोटी रुपयांनी महसूल वाढेल आणी लोकांची एकाच दुकानावर पडणारी गर्दी कमी होवुन कोरोना संसर्ग बद्दल भिती कमी होईल. तरी अपणास विनंती की, राज्यातील  बार/परमिट रूम मध्ये पार्सल पध्दतिने दारु विक्रीस परवानगी देवून कमी गर्दीत महसूल वृद्धी साधने साठी आवश्यक ती उपाययोजना करने कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत असे ढुस यांनी म्हंटले होते. या मागणीसह आत्तापर्यंत ढुस यांनी मागणी केलेले बहुतेक सर्व मुद्दे राज्याचे कार्यक्षम  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तात्काळ मान्य केल्या असलेने आप्पासाहेब ढुस यांनी हार्दिक आभार व्यक्त केले.
close