हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.09 मे हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात असलेल्या अनेक गावात जि.प.च्या वतीने जलयुक्त शिवार अंतर्गत सिमेंट नदी,नाल्यावर रूंदीकरण व खोलीकरण करून त्यावर बंधारे बांधण्याचे काम कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात केले जात असुन सेनगाव तालुक्यातील गुगळ पिंप्री येथील ठेकेदार कमी ग्रेटची सिमेंट तसेच अवैध उपसा केलेली मातीमिश्रित रेती,जुनाट गज वापरून बंधा-याचे संपूर्ण काम केले असल्याने तो बंधारा पहिल्याच पाण्यात वाहुन जाण्याची शक्यता असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलल्या जात आहे.
सेनगांव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधा-याचे कामे कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात केले जात असुन याचा फायदा शेतक-यांना होणार असल्याचे जि.प.विभागाकडुन बोलल्या जात असले तरी अनेक बंधा-याचे कामे निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे दिसत आहे.सेनगांव तालुक्यातील गुगळपिंप्री येथील ठेकेदाराने बंधारा कामात कमी ग्रेटची सिमेंट तसेच अवैध उपसा केलेली माती मिश्रीत रेती बरोबर जुनाट गज वापरून बंधा-याचे संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे केले असुन विशेष बाब म्हणजे तहसिल प्रशासनाने गुगळपिंप्री येथे अवैध 15 ब्रास रेतीसाठा जप्त करून दि.07 एप्रिल रोजी पंचनामा करून स्थानिक पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला होता.परंतु संबंधित ठेकेदाराने जप्त केलेली रेती बांधकामात वापरली असल्याचे दिसुन आले. संबंधित विभागाकडुन आर्थिक हित साधत आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. संबंधित ठेकेदाराने अवैधरित्या रेतीसाठा केल्याबद्दल महसूल विभागाने कोणताच दंड व कोणतीच कार्यवाही केली नाही त्यामुळे महसूल विभागाची भुमिका संशयास्पद असुन आर्थिक हित जोपासण्याचे काम महसूल विभाग करत असल्याचे दिसुन येत आहे. बंधा-याचे काम निकृष्ठ दर्जाचे केले असुन अवैध रेती उपसा केला गेला तरी ही याकडे कोणत्याही संबंधित अधिकारी जि.प.चे इंजिनिअर भांगिरे यांनी दुर्लक्ष केले.शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून शेतक-यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बंधारा बांधण्यात आला असला तरी बंधा-याचे संपूर्ण काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असुन पहिल्याच पाण्यात वाहुन जाणार असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलल्या जात आहे.तरी याकडे संबधीत वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.