shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ताम्हाणेवस्ती चिखली आणि मोशीत कोरोनाचे ३ ‘पॉझिटिव्ह’, शहरातील बाधितांची संख्या १५४ वर

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी चिंचवड शहरातील ताम्हाणे वस्ती चिखली येथील तरूण, एक ज्येष्ठ महिला व मोशीतील महिला अशा तिघांना कोरोना संसर्ग झाल्याचे शुक्रवारी सकाळी एनआयव्हीकडून आलेल्या रिपोर्टनुसार स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या १५४ झाली आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात शहरातील ८० आणि शहराबाहेरील ९ जण उपचार घेत आहेत. तर, शहरातील ६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार जण पुण्यातील आहेत.



महपालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील ताम्हाणे वस्ती चिखली आणि मोशी येथील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात २९ वर्षीय पुरूष तसेचल ३३ आणि ७५वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज आढळलेल्या तीन रूग्णांमुळे शहरातील आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १५४ वर पोहचली आहे.
close