सावळीविहीर। राजकुमार गडकरी :
शिर्डी लगतच्या निमगाव कोर्हाळे गावात ११मे रोजी पहाटे ४वाजेच्या सुमारास साईबाबा संस्थानच्या भोजनालयात काम करत असलेल्या भागवत दामोधर साळवे यांची होंडा शाईन एम एच १७ सी बी २११४ व त्यांचे नातेवाईक संखाराम गोविंद विर यांची बजाज डिस्कव्हर एम एच १७ अॆ एच ५८३४व हिरो होंडा एम एच १७वाय६०२२अशा जवळपास एक लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी पेट्रोल टाकून कोणीतरी खोडसाळ पणे पेटवून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.लॉकडाउन काळात ही घटना घडल्याने येथे मोठी भिती निर्माण झाली आहे.
एक महिन्यापूर्वी येथील बाळू ठाकरे यांची नवी कोरी कार पेटवून देण्यात आली होती. अजुन त्या आरोपींचा शिर्डी पोलीसांना तपास लावण्यात यश आले नसताना परत संचारबंदी व लाॅकडाउन सुरू असताना अडचणी मध्ये आलेल्या रोजंदारीवर काम करत असलेल्या साळवे यांच्या सह नातेवाईक लोकांच्या दुचाकी पेटवून देणार्या आरोपींचा शिर्डी पोलीसांनी शोध घ्यावा अशी मागणी भागवत साळवे यांनी शिर्डी पोलीसात दिलेल्या तक्रारीत केली आहे. पहाटे ४वा.ही घटना समजताच आरडाओरड केली गेली पण आरोपी फरार झाले.सकाळी घटनास्थळी शिर्डी पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या कुटुंबातील लोकांना आधार देण्यासाठी सरपंच कातोरे उपसरपंच अजय जगताप, विजय कातोरे, चेअरमन राजेंद्र गाडेकर,आदीनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी तलाठी भाऊसाहेब मांढरे ,ग्रामविकास अधिकारी आर के गायकवाड हजर होते.तीन दुचाकी पेटवून नुकसान करणारा जो कोणी संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून असा प्रकार करत असेल अशा आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

