shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना समुळ नायनाट होण्यासाठी साईभक्तांनी साईबाबांकडे घातले साकडे..!!

सावळीविहीर। राजकुमार गडकरी:
कोरोना विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या देश विदेशातील कोरोना योद्यांना आणखी स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा  लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत राहाता तालुक्यातील हजारो साई भक्तांनी आज दि,२१ मेला दुसर्‍या गुरुवारीही तालुक्यातील गावागावातील घराघरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले. या उपक्रमात राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. त्यास साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.




       
जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून दररोज देशात, जगात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, अशा कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, अधिकारी-कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी,प्रत्रकार, प्रशासन व प्रत्येक जण आपापल्या परीने अहोरात्र काम करीत आहे.असे कोरोनावॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटवण्यासाठी लढा देत आहेत.रुग्णांची सेवा करीत आहेत.यालॉकडाऊन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत ,सुविधा पुरवित आहेत, अशा सर्वाना  स्पूर्ती मिळावी, त्यांचे कौतुक अभिनंदन व्हावे, म्हणून व या देशातून, जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना आज गुरुवार दि,२१मे रोजी साकडे घालण्यात आलेआहे, 




शिर्डी येथील श्री साई निर्माण ग्रुप द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक२१ मे रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत राहाता तालुक्यातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साईस्तवनमंजरी व लकी ड्रॉ द्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपल्या घरात राहून देवघरासमोर किंवा श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण  घराघरात करण्यात आले, अनेक साईभक्तांनी लकी ड्रॉ काढून मिळालेला अध्याय आपल्या घरात वाचला ,कुणी हा अध्याय मोबाईलवर वाचला, कोणी लॅपटॉपवर 



वाचला, कोणी ग्रंथातून वाचला तर कुणी हिंदी मधून ,कोणी मराठीमधुन, कुणी संस्कृत मधून, कोणी इंग्लिश मधून ,कोणी गुजरातीतून, विविध भाषात हा अध्याय वाचून पारायण केले. लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येकाने आपापल्या घरात श्री साईचरित्र पारायण यांचे वाचन करून श्री साईबाबांची प्रार्थना करत कोरोनाला हटवण्या साठी साईबाबांकडे साकडे घातले, या धार्मिक उपक्रमाला मागील गुरुवारी 14 मेला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला,होता, असाच मोठा प्रतिसाद आज गुरुवारी 21 मेला राहता तालुक्यातून गावागावातून मोठ्याप्रमाणात मिळाला आहे.तसेच पुढच्या गुरुवारी २८ मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात असे सामूहिक पारायण घराघरात राबविण्यात येणार आहे.साईचरित्र पारायणा चा तिसरा टप्पा गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ,प्रत्येक गावागावात होणारअसुन, 



त्यानंतर ४जूनला संपूर्ण देशात  व त्यानंतर पुढच्या गुरुवारी११जुनला संपूर्ण जगातील साईभक्त असे घरात राहून श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करणार आहेत. हा एक  मोठा उपक्रम  राबविण्यात येत असून सर्वांनी मोठ्या संख्येने या धार्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान  साई निर्माण ग्रुप ,साई संदेश प्रतिष्ठान व द्वारकामाई प्रतिष्ठानने केले आहे .




close