हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.15 मे हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नविन सिमेंट बंधा-याचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्याने ठिक ठिकाणी तडे गेल्याचे दिसत आहे.
हिंगोली जिल्हा परीषदेच्या वतीने सेनगांव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी,नाल्यावर रूंदीकरण करून सिमेंट बंधा-याचे कामे कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.गुगुळ पिंपरी येथील बंधारा अवैध रेती प्रकरणामुळे चर्चेत असतांना त्यात या बंधा-याला ठिक ठिकाणी तडे गेल्याचे दिसत आहे.संबंधी गुत्तेदाराने सिमेंट बंधारा बांधकामात माती माश्रित रेती,हलक्या दर्जाची सिमेट,जुनाट गज वापरल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे दिसत आहे.जि.प.चे संबधीत इंजिनिअर यांनी अद्याप पर्यंत या बंधा-याला भेट देऊन पाहाणी सुध्दा केली नसल्यामुळे या बंधा-याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे शेतकरी वर्गातुन बोलल्या जात आहे. गुगुळ पिंपरी येथील याच सिमेंट बंधारा जवळच बांधकाम करणा-या गुत्तेदारानेच अवैध रेतीसाठा केला होता. दोन महिन्यापुर्वी तहसिल विभागाने हा अवैध 15 ब्राॅस रेतीसाठा जप्त करून पंचनामा करून रेतीसाठा पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला.गुत्तेदाराने याच रेतीसाठ्यातुन सिमेंट बंधारा बांधकामात रेती वापरल्याचे बोलल्या जात आहे.तहसिल प्रशासनाने रेतीसाठा जप्त करून दोन महिने झाले तरी पण संबंधीत गुत्तेदारावर कारवाई का झाली नाही हे कळायला मार्गच नाही.कारवाई करण्यास आर्थिक हित जोपासुन विलंब होत असल्याचे चित्र महसुल विभागाकडुन होत असल्याचे निर्दशनास येत आहे.नविन सिमेंट बंधा-याचे काम अंत्यत निकृष्ठ दर्जाचे झाल्याने ठिक ठिकाणी तडे गेले असुन संबधीत गुत्तेदारावर अवैध रेतीसाठा केल्याबद्दल तहसिल प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून तडे गेलेल्या बंधा-याचे पुन्हा बांधकाम करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
प्रतिक्रिया
सेनगांव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे अवैध रेतीसाठा जप्त केला असुन संबधीतांना नोटीशी पाठविल्या असुन लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल
जीवककुमार कांबळे
तहसिलदार सेनगांव


