shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घरमालकाने घरात घेण्यास नकार दिलेल्या मायलेकीची पत्रकार कुवेसकर आणि नगर सेविका चव्हाण यांनी केली कोरोंटाईन व्यवस्था

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ): 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे मुंबईमध्ये अडकून पडलेली एक आई आपल्या ३ वर्षाच्या मुलीसह आपल्या पतीकडे माणगांव येथे राहत्या घरी आली असता घर मालकांनी मात्र त्यांना घरात राहण्यास विरोध केला. तिच्या पतीने घर मालकांना पत्नी व मुलींनी डॉक्टरकडून रीतसर वैद्यकीय अहवाल घेतला असल्याचे सांगत होम क्वारांटाईन करण्याची विनंती केली परंतु काही फायदा झाला नाही. नाईलाजास्तव त्यांना आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला घेत घराबाहेर रस्त्यावर थांबण्याची वेळ आली. अशा वेळी त्यांनी आपल्या परिचयाच्या एका व्यक्तीला सांगितले. त्यांनी नगरसेवक, नगरपंचायत कार्यालय, सबंधित कर्मचारी सगळ्यांना फोन केले परंतु कोणीही फोन उचलले नाहीत. शेवटी मग काहीतरी मार्ग निघावा याकरिता ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांना फोन केला. त्यांनी काही अर्धा तासाभरातच त्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावला.


      
पत्रकार कुवेसकर यांना माहिती मिळताच त्यांनी लगेच नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांना फोन केला आणि माहिती दिली आणि स्वतः जागेवर जाऊन नगराध्यक्षा यांच्या समवेत पाहणी करुन या अडचणीत सापडलेल्या कुटुंबाची चौकशी केली. संपूर्ण परिस्थिती समजून घर मालकाशी सविस्तर चर्चा केली परंतु ती व्यर्थ ठरली. त्यावेळी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी मग क्षणाचा देखील विलंब न करता माणगांव नगरपंचायती कडून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची सुविधा केलेल्या ग्लोबल इन्स्टिट्यूट येथे सर्व प्रोटोकाॅल प्रमाणे त्यांची कोरोंटाईन व्यवस्था केली आहे.
close