चिंचवड, दि.१७ – पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराशेजारी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे.
ही घटना आज दुपारी ०४ च्या सुमारास घडली आहे, मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार आज रविवार दुपारी तिघे मित्र पार्टी करण्यासाठी जमले होते ह्या तिघांनी भरपूर दारू आणि गांजा याचे सेवन केले व अचानक तिघांमध्ये वाद झाले व एका मित्राने थेट संतोष कुलकर्णी याच्या डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या केली.
पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासणी करीत आहेत.


