shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तर वसुली अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल- मनसे

श्रीरामपूर : करोना संसर्ग आजारामुळे संपूर्ण देश हा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. म्हणून व्यापार व्यवसायाप्रमाणेच महिला बचत गटावर देखील आर्थिक संकट ओढलेले असून राज्यसरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या बँका, फायनांस कंपनी तसेच महिला बचत गट पतसंस्थांकडून ज्या लोकांनी कर्ज घेतलेले आहे या सर्व लोकांचे देखील कर्ज माफ करण्यात यावे.



लोकांच्या हाताला काम नसल्याने ह्या लोकांची घर चालवण्याची पंचायत झाली आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशी परस्थितीत बँक, फायनान्स, बचत गट वसुली अधिकारी फोन करून वारंवार कर्जाच्या पैशाची मागणी करतात व काही जनांच्या घरी येऊन उद्धट भाषात बोलून दमदाटी करत आहे. आशा परस्थितीत लोकांची मानसिकता बिघडून त्यांना बँकेचे लोक मानसिक त्रास देऊन कर्जधारकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. म्हणून याची गंभीर स्वरुपाची दखल घेऊन शासनाने जोपर्यंत लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत कर्जधारकांना हप्त्याची त्यांना सवलत द्यावी अशा प्रकारचे सवलतीचे कर्ज धारकांना सहकार्य मिळावे असे निवेदन देऊन देखील कर्ज धारकांना वसुली अधिकाऱ्यांकडून त्रास होऊन कर्ज धारकांच्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास वसुली अधिकाऱ्यालाच जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात यावी,

त्वरित सर्व प्रकारच्या कर्जाची वसुली थांबविण्यात यावी असे न झाल्यास मनसे स्टाईलने वसुली अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल त्या प्रसंगी काही अनौचीत प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील. असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे द्वारा प्रांतकार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.
close