मुंबई :- पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील (कंटेंटमेंट झोन वगळता) दारू दुकाने सुरू राहणार की नाही, यावरील गोंधळ आता संपला आहेत. आता उद्यापासून म्हणजे ४ मे पासून या दोन्ही शहरांतील दारू दुकाने खुले राहतील, अशी घोषणा राज्य सरकारचे सचिव भूषण गगराणी यांनी केली. या शहरांतील हाॅटेल, रेस्टाॅरंट मात्र बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दारूच्या दुकानांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनची मुदत दोन आठवडे वाढवितानाच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रेड झोनमधील तळिरामांमध्ये काहीशी निराशा होती. त्यानंतर पुन्हा तिन्ही झोनमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काल रात्री दारूविक्रीची परवानगी दिली. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याआधीच एक आदेश काढून रेड झोन आणि कंटेटमेंट झोनमध्ये दारूविक्रीला मनाई केली होती. अखेर त्यावरील गोंधळ राज्य सरकारने संपवला. रेड झोनमध्ये आणि पालिका क्षेत्रातही (कंटेटमेंट वगळता) दारूविक्रीला परवानगी देण्यात आली आाहे.
सोशल डिस्टनिंगबरोबरोबर एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाही हे नियम पाळावे लागणार आहेत. मद्यविक्री बंदीमुळे रोज घेणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. चोरीने आणि अधिक पैसे मोजून काही दिवस दारू घेतली पण, स्टॉक संपल्याने आणि पोलिसांच्या कारवाईने तळिराम दारू केंव्हा मिळेल या प्रतीक्षेत होते. दोन लॉकडाऊननंतर आता तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र तळिरामांना दिलासा मिळाला आहे. दारूविक्रीस परवानगी दिल्याने सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपानेही भर पडणार आहे. अनेक राज्यांनी दारू विक्रीस परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे केली होती.


