shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळानुसार स्वतःला अपडेट करणारी प्रगती

पत्रकाराच्या नजरेतून ...
लॉकडाऊन म्हटले की प्रत्येकाला वाटते ती शिक्षा.  कारण आपण कधीच सक्तीने घरातच कोंडून घेतले नाही. पण यात पण खूप शिकण्यासारखे आहे हे मी घरातच बसून अनूभवले आहे. अशीच प्रत्येकाने काय काय केले हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाशी मी संवाद साधला. 
यात  प्रगती मोरे हि काय म्हणते ते आपल्यापुढे मांडत आहे. अभिनय आणि लिखाणाची प्रचंड आवड असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रगती मोरे हिने स्वत:हाचे इव्हेंट्स आणि एअरपोर्टवरील जॉब सोडून स्वत:हाला या इंन्डस्ट्रीमधे झोकून दिले .




प्रगती लॉकडाऊन सुरु आहे ..काय करतेस या अचानक मिळालेल्या भरपुर वेळेत......
या मिळालेल्या वेळेत खुप काही करते ..खरतर हा वेळ स्वत:मध्ये नवनविन बदल करण्याचा आहे. म्हणून मी स्वतःमधे नवनविन बदल करण्याचा प्रयत्न करते...
 सकाळी उठुन सूर्यनमस्कार आणि संगीत रियाज़ करते ..त्यानंतर अंघोळ वगैरे झाली की..गुरुदेव दत्तांना नमस्कार करुन जगावरील संकट लवकर दूर होवो ही प्रार्थना करते...मग माझा ब्रेकफास्ट आणि मग थोडी घरकामात मदत करते..मग दुपारचे जेवण  झाल्यावर ..झोपायची सवय नसल्यामुळे एपिसोड बघत बसते ..आणी तोपर्यंत आवडीचा टाईम सुरु होतो म्हणजे चहा आणि कॉफीचा आणि त्यासोबत मस्त बिस्किट बुडून खाण्याचा....



या लॉकडाऊनमधे तुला काय आवडत...?
लॉकडाऊनमधेच आवडणे असे काही नाही..पण नेहमीच आवडते अश्या गोष्टी म्हणजे...मला जुनी गाणी फार आवडतात ऐकायला..आणि अता या लाँकडाऊनमधे आणि नेहमीच मी ते ऐकत असते.. लिखाणाची आवड असल्यामुळे स्वत:च्या कविता आणि गाणी लिहित असते...हातात पेन आणि समोर वही ठेऊन सतत काहीना काही लिहणे आणि लिखानामध्ये रमणे हे फार जास्त आवडते..आणि तसेच म्हटले तर नवनविन गोष्टी शिकणे व  रात्री टेरेस वर जाऊन ती रात्रीची शांतता व आकाशात ते चंद्र चांदने आणि रात्रीची गार हवा ते अनुभवायला आवडते ....



संध्याकाळी काय करतेस..?
संध्याकाळी चहा कॉफी सोबत मस्त स्नँक्स बनवतो.. ते झाले की लिहिलेल्या कविता आणि गाणी मित्रमैत्रिणींना ऐकवते..मग कॉलवरच ते कंपोज करतो.. कारण या लॉकडाऊन मध्ये सर्वकाही बंद असल्यामुळे मोबाइल हे एकच साधन आहे ज्यामुळे संवाद तरी साधता येतो...आणि काही आइडियाज शेयर करता येतात...संध्याकाळी मी परत एक तास तरी संगीत रियाज़ करते.. त्यानंतर आईला स्वयंपाकात मदत करते..मग जेवन करुन सर्व काम उरकून थोडा वेळ सोशल मीडिया वर अपडेट राहते...

क्वारंटाइनबाद्दल तुला काय वाटतं....?
या क्वारंटाइनने सर्वांनाच खुप काही शिकवले असे मला वाटते..आणि त्यामधेच मला माझ्या नव्या प्रगतीला आत्मसात करता आले...या जगामध्ये कशासाठी धावपळ चालू होती तेच कळत नव्हते .आणि कुठेतरी थांबण्यची गरज वाटत होती ...सो मला वाटते हाच तो परफ़ेक्ट टाईम आपल्यांबरोबर वेळ घालवता येण्याचा..आणि थोड्या दिवस प्रदुषण मुक्त राहण्याचा ..

खरतरं.. या क्वारंटाइनमध्ये मला काय वाटते.. हे या चार लाईन्स मधून मी सगळ्यांना सांगू इच्छीते....

"हे मानसा नको विसरु तू 
जगात आलास कशासाठी तू
लोभ पैसा अहंकार सोडुनी
अता तरी मोकळा हो तू...

सर्व सोडुनी एक हाेवू आता
नको गुन्हेगारी नको त्या जुन्या गाथा..
ठेवूनी सोशल डिस्टंन्स घराच्या बाहेर अणि आत 
मुक्त करुयात कोरोणाची साथ "

STAY HOME STAY SAFE....
यावरून प्रगती हि खरच काळानुसार बदलल्याने आपण सुध्दा अपडेत  रहायला हवे....

अरूण ठोंबरे
पत्रकार/संपादक
9322107521
close