shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Corona : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारातून आता कर्मचाऱ्यांनाही ‘नो-एन्ट्री’

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पिंपरीतील मुख्यालयाच्या इमारतीमधील मुख्य प्रवेशव्दारातून मनपा कर्मचाऱ्यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर केवळ आयुक्त, प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवकांना येथून प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान इमारतीच्या मागील गेटमधून सध्या सर्व कर्मचाऱ्यांना आत सोडले जात असून प्रशासनाच्या आदेशानुसार आज (दि.२६) पासून हा निर्णय घेण्यात आला आहे.



पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. मात्र तरी देखील कोरोना वॉरिअर्स असलेले डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार यांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेत. महापालिकेच्या इमारतीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केलीयं. महापालिकेत नागरिकांची कामानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखाच्या परवानगीने दुपारी २ नंतर प्रवेश दिला जाईल असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच इमारतीतील मुख्य प्रवेशव्दारातून केवळ अधिकारी आणि नगरसेवक यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर मनपा कर्मचाऱ्यांना इमारतीच्या मागील गेटमधून आत प्रवेश दिला जात आहे.
close