shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. लंके यांच्या तत्परतेमुळे राज्यातील पहिली एस टी धावली पारनेर आगारातून !

लॉक डाउन मुळे अडकलेले परराज्य, परजिल्ह्यातील ५०० मजूर एस टी ने रवाना

राज्य सरकारने परजिल्ह्यात, परराज्यात प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी जाऊ इच्छिणाऱ्या सर्व मजुरांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्याबरोबरच संबंधित मजुरांना प्रवासासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता आ. लंके यांच्या संपर्क कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. मजुरांच्या रवानगी संदर्भातील सर्व सोपस्कार वेळीपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे  राज्यात गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले एस टी चे चाक रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पारनेर आगारातून फिरले. रविवारी दिवसभर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यासह राज्याच्या विविध भागांतील मजूर रवाना करण्यात आले, दरम्यान शनिवारीही काही मजूर खाजगी वाहनाने पाठविण्याची व्यवस्था आ. लंके यांनी केली होती. आ. लंके यांनी गेली दीड महिना बाहेरच्या मजुरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शेकडो मजुरांनी लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांच्या डोळयांत अश्रू उभे राहिले. अडचणीच्या काळात आमदार साहेबांच्या रूपाने देव भेटल्याचा भावुक प्रतिक्रिया मजुरांनी दिल्या.

आ. निलेश लंके 


मजुरांच्या रवानगी प्रसंगी आ. निलेश लंके,  तहसिलदार ज्योती देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश लाळगे, आगार प्रमुख पराग भोपळे, सहा. पोलिस निरीक्षक राजेश गवळी आदी यावेळी उपस्थित होते.

आ. लंके यांच्याकडून बिस्कीटे, पाणी बॉटल
प्रवासासाठी निघालेल्या मजुरांना आ. लंके यांनी बिस्किटे, पाण्याच्या बॉटलचे वितरण केले. लहानग्यांना खाऊ देत सर्वांना हृदय निरोप दिला.

निलेश भैय्या राखी के लिये जरूर आना!
लॉक डाउन झाल्यामुळे अन्न सोडा, पाणी मिळण्याची चिंता निर्माण झाल्यानंतर आ. लंके यांनी हजारो मजुरांच्या सकाळचा नास्ता, दोन वेळचे जेवण, निवारा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ नियोजन करून राज्यात सर्वप्रथम मजूर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे विशेषतः भावुक झालेल्या महिलांनी अश्रू ढाळत आ. लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उत्तरप्रदेशातील  तनुजा या महिलेच्या नेतृत्वाखालील दहा ते बारा महिलांनी बस मध्ये बसण्यापूर्वी आ. लंके यांची भेट घेत अक्षरशः हंबरडा फोडला. ' नीलेश भैय्या आपने हमारी बडी सेवा की है. अभी हम महाराष्ट्रामे वापस नही आ सकते, आनेवले राखी को हमारे घर जरूर आना, हम तुम्हारा इंतजार करेंगे' अशी वीणवणी केली. त्यामुळे आ. लंके यांनी अश्रूंना मोकळी वाट करून देत त्यांच्या आमंत्रणाचा नम्रपणे स्वीकार केला.

--------------------------------------------------------------------------------------------------------------
close