shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहूगाव ग्रामपंचायतीला पिंपरी चिंचवड महापालिका दीड लाख मास्क देणार – महापौर माई ढोरे


पिंपरी-चिंचवड, पुणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने श्री क्षेत्र देहूगाव ग्रामपंचायतीला दीड लाख मास्क मोफत पुरविण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.



सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना (कोविड-१९) विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी, पुणे यांनी विविध आदेश व सुचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये मास्क घालणे नागरीकांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यादृष्टीने श्री क्षेत्र देहूगाव ग्रामपंचायतीने मास्कचा पुरवठा करण्यासंबंधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे मागणी केली होती. पिंपरी चिंचवड शहरालगत संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र देहूगाव वसलेले आहे. संत तुकाराम महाराजांच्या परोपकारी वृत्तीची व कार्याची संपूर्ण जगाला ओळख आहे. या परोपकार वृत्तीची जाणीव लक्षात घेऊन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी श्री क्षेत्र देहूगांव ग्रामपंचायतीस दीड लाख मास्क महापालिकेकडून तातडीने पुरविण्याबाबत प्रशासन आणि वैद्यकिय विभागास सुचना दिल्या आहेत.
close