shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौतुकास्पद : वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना विरोधातील लढ्यास ॲम्बुलन्स चालकाचा मदतीचा हात..!


पिंपरी-चिंचवड:
पिंपरी - वाढदिवस म्हटलं की प्रत्येकजण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो. परंतू ॲम्बुलन्स चालक असेलल्या मारूती जाधव यांनी त्यांचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केलायं. कोरोनाच्या या संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून १ हजार मास्कचे वाटप करत कोरोना विरोधातील लढ्यास मदतीचा हात दिला आहे. मारूती जाधव यांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वच स्तरातून कौतक होत आहे.



मारूती जाधव हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात (वायसीएम) ॲम्बुलन्स चालक आहेत. सध्या कोरोनाच्या या संकटात एका योध्दा प्रमाणे ते लढत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या ‘कोरोनामुक्त’ झालेल्या रूग्णाला ॲम्बुलन्समधून सुखरूप घरी सोडण्याचे कार्य मारूती जाधव यांनी केले होते. कोरोनाच्या या लढाईत संसर्ग होण्याचा मोठा धोका असताना देखील अतिशय समर्थपणे त्यांच्यासह अनेक चालक आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.

नुकताच मारूती जाधव यांचा वाढदिवस झाला. मात्र कोरोनाच्या या संकट काळात त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या कार्याची प्रेरणा घेत एका वेगळ्या पध्दतीनं वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून यशवंतराव चव्हाण रूग्णालयात तसेच चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन व भोसरी midc पोलीस स्टेशन तसेच जेष्ठ नागरिकांना मास्क वाटप केले आहे. नोकरी बरोबरच आपणही समाजाचं काहीतरी लागतो या भावनेतून त्यांनी ही मदत केली आहे. मारुती जाधव यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने वाढदिवसाच्या निमित्ताने असेच समाजउपयोगी कार्य केले पाहिजे.
close