सलमानच्या मदतीचा ओघ थांबेना; बैलगाडी, ट्रॅक्टरच्या माध्यमातून किराणा सामान रवाना
करोना विषाणूमुळे सध्या अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. काही क्षेत्रांमधील कामकाज बंद झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये प्रशासन, सेलिब्रिटी आणि व्यावसायिक विविध माध्यमातून गरजूंसाठी मदत करत आहेत. यातच सलमान खानदेखील सातत्याने त्याची मदत करत आहे. आतापर्यंत सलमानने अनेकांना मदत केली असून आता त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी त्याने बैलगाडी, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत किराणा सामान पोहचविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या सलमानने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सलमानने आतापर्यंत अनेकांसाठी मदत केली आहे. यापूर्वी त्याने गरजू कामगारांना एक ट्रक भरुन किराणा सामान पुरविलं आहे. तसंच कलाविश्वातील जवळपास २५ हजार गरजूंसाठी त्याने आर्थिक मदत केली आहे.

या व्हिडीओमध्ये बैलगाडी, ट्रॅक्टर आणि अन्य गाड्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत किराणा सामान पोहोचविण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी त्याच्यासोबत यूलिया वंतूर, जॅकलीन फर्नांडिस आणि घरातील अन्य सदस्य दिसून येत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करुन त्याने साऱ्यांचे आभार मानले आहेत.