shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोलीत हरिओम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडुन गरजुना २५०० किटचे वाटप

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.04 मे शहरालगत असलेल्या अकोला बायपास भागातील बळसोंड येथील हरीओम  बहुउद्देशीय संस्थेकडुन कोरोनाच्या संकटकाळी या संस्थेचे अध्यक्ष पप्पूभाऊ चव्हाण व मित्र मंडळातर्फे गरजू गोरगरीब व्यक्तीना २५०० किटचे मोफत अन्नधान्य वाटप आज दि.04 मे सोमवार रोजी करण्यात आले.
       






हिंगोली शहरालगत भागातील बळसोंड भागातील हरीओम सेवाभावी संस्थेकडुन कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये गरजु व्यक्तीना अन्नदान,कपडे वाटप,नगरातील स्वच्छता,संस्थेमार्फत स्वच्छता घंटागाडी असे उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच भाग म्हणून गोरगरीब गरजु व्यक्तीना,मोलमजुरी करणाऱ्याला,घरपोच जावुन तांदुळ,गहु,साखर अशा जीवनाश्यक वस्तुचे बळसोंड,संत नामदेव नगर,छञपती शिवराय नगर,आनंद नगर,रामाकृष्णा नगर,झोपडपट्टी, गवळीपुरा,तालाब कट्टा आदी ठिकाणी २५०० किटचे वाटप करण्यात आले. यावेळी विनायकराव भिसे-पाटील,हरीओम सेवाभावी संस्था अध्यक्ष पप्पूभाऊ चव्हाण,, राजेश मोकाटे,मनोज बांगडे,सुनील बुडकेवर,बालाजी लाटकर,प्रवीण जाधव,सुमित घिके, राहुल धुळे,दिलीप माने, राजरत्न भाऊ ,राजू कोरवी,सह मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
close