मित्रहो नमस्कार
आता तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुम्हाला नक्कीच माहिती नसणार आणि ती ऐकल्यानंतर खरंच आपण मंत्रमुग्ध होउन जाल आणि नक्कीच ठरवाल की आपण हे करायचंच ..
आपण आपल्या जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतो हा प्रवास कधी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांमधून कधी स्वतःच्या गाडीतून तर कधी रेल्वे गाड्यांमधून भारतात रेल्वेचे भरपूर मोठे जाळे आता तयार आहे प्रत्येक राज्यामध्ये रेल्वे पोहोचली आहे रेल्वेचे जाळे तयार होत असताना काही रेल्वे स्टेशन एकापेक्षा अनेक मार्गांना जोडली गेलेली आहेत त्यांना आपण जंक्शन असे म्हणतो काही छोटी रेल्वे स्थानक असून काही मोठीही रेल्वे स्थानक आज भारतात कार्यरत आहेत काही ठिकाणी सगळ्यात गाड्या थांबतात तर काही ठिकाणी फक्त एक्सप्रेस किंवा जलद गाड्या थांबतात अर्थात अशी रेल्वे स्टेशन आपण कितीतरी पाहिलेली आहेत यापैकी प्रत्येक स्टेशन हे कोणत्यातरी गावात तालुक्यात जिल्ह्यात आणि पर्यायाने राज्यातच असते
मित्रहो याच रेल्वे स्टेशनच्या बाबतीत एक गंमत आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवर असलेल्या एका रेल्वे स्टेशनच्या बाबतीत दिसून येते हे रेल्वेस्टेशन वेगळ आहे ते त्याच्या भौगोलिक स्थानामुळे. सुरत भुसावळ या मार्गावरील रेल्वे स्टेशन वेगळे पणा घेऊन कसं उभं आहे त्याची माहिती घेऊया.
ज्यावेळी नवापुर रेल्वे स्टेशन याची निर्मिती झाली त्यावेळी ते एकाच राज्यात म्हणजे मुंबई राज्यांमध्ये उभ केलं त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन राज्य नव्हती त्यांचे मिळून एक राज्य होतं परंतु कालांतराने या राज्याचे दोन राज्यांमध्ये रूपांतर झालं आणि महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेवर असलेलं हे स्टेशन वेगळ्या पद्धतीने गणलं जाऊ लागलं
या नवापुर रेल्वे स्टेशन महत्व आणि गंमत अशी आहे याचा उत्तरेकडील अर्धा भाग हा गुजरातमध्ये तर दक्षिणेकडील अर्धा भाग महाराष्ट्र मध्ये येतो जेव्हा गाडी सुरत कडून भुसावळला येते तेव्हा गाडीचे इंजिन व मागील अर्धे डबे महाराष्ट्रात तर उर्वरित अर्धे डबे गुजरात मध्ये उभे असतात गाडी जेव्हा भुसावळकडून सुरत ला जात असते त्यावेळी इंजिन आणि अर्धे डबे गुजरातमध्ये तर उर्वरित अर्धे डबे महाराष्ट्रात उभे असतात याची तिकीट खिडकी महाराष्ट्रात आहे तर स्टेशनमास्तर गुजरातमध्ये बसतात वेटिंग रूम प्रसाधनगृह आणि इतर काही भाग महाराष्ट्रात असून स्टेशन वरील काही कर्मचारी व कंट्रोलिंग युनिट गुजरातमध्ये आहे एकूण चार फॉर्ममध्ये हे स्टेशन उभे असून प्लॅटफॉर्म वरील काही बाकडी महाराष्ट्रात तर काही बाकडी गुजरात मध्ये आहेत गंमत म्हणून इथे एक बाकडे मुद्दामूनच अर्ध गुजरातमध्ये तर अर्ध महाराष्ट्रात बसवण्यात आला आहे रेल्वे स्टेशन वरील कॅन्टीन किंवा उपग्रह हे महाराष्ट्रात असून आपल्याला पाणी यायचे झाल्यास गुजरातमधील भागात जावे लागते कारण पिण्याच्या पाण्याची टाकी ही गुजरातमध्ये आहे.
मित्रहो हा झाला गमतीचा भाग परंतु या स्टेशनवर कायदे सुद्धा अर्ध्या-अर्ध्या भागात वेगवेगळे आहेत महाराष्ट्रातल्या भागावर महाराष्ट्रातले कायदे लागू होतात तर गुजरातमधल्या भागावर गुजरातचे कायदे लागू होतात गुजरातमध्ये संपूर्णतः दारू बंदी आहे त्यामुळे या स्टेशन वरील गुजरात मध्ये असलेल्या भागात दारू घेऊन जाणे हा गुन्हा मानला जातो तर महाराष्ट्रातल्या भागामध्ये ती चालते तंबाखूजन्य पदार्थ विकण्या महाराष्ट्रात बंदी आहे तर ती गुजरातमध्ये नाही त्यामुळे गुजरात कडच्या भागात तंबाखू विक्री केल्यास तो गुन्हा नाही पण महाराष्ट्रातील भागात विक्री केल्यास तो गुन्हा ठरतो दोन्ही राज्यांमध्ये अर्ध असलेलं असं भारतातलं हे पहिलं स्टेशन आहे या स्टेशनवर गाडी आल्यानंतर अनाउन्समेंट इंग्रजी हिंदी राष्ट्रभाषा म्हणून तर राजकीय भाषा म्हणून मराठी व गुजराती या चारही भाषांमध्ये होते सुमारे दिवसाला 200 गाड्या येथून ये-जा करतात
प्रत्येक प्लॅटफॉर्मवर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही भागांच्या बरोबर मध्ये एक मोठी पांढरी रेषा काढली असून त्या त्या राज्यांची नावे त्या त्या भागात प्लॅटफॉर्मवर रंगवली असून पोलिस यंत्रणा सुद्धा दोन्ही राज्यांच्या एकाच ठिकाणी काम करतात व त्या प्लॅटफॉर्मवरील आपापल्या भागातच लक्ष देत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भागात एखाद्या प्रवाशाने जर गुन्हा केला तर तो पोलिसांना चुकवणे करता म्हणून धावत गुजरातच्या भागात जातो याउलट गुजरात कडील भागात जर एखाद्याने अपराध केला आणि त्याला पोलीस पडावयास लागले तर तो पटकन महाराष्ट्राच्या भागात धावत जातो आणि पोलिस हतबल होऊन फक्त पहात बसतात कारण दुसऱ्या राज्यांमध्ये घडलेल्या गुणांच्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्याकरिता कागदपत्र व आदेश आणावे लागतात आणि अशी चकमक गुन्हेगार आणि पोलीस यांच्यात बहुतेक वेळा बघावयास मिळते अर्थात तेथील प्रवाशांचा एक आगळावेगळा करमणुकीचा कार्यक्रम असतो
या सगळ्या गोंधळात रेल्वेचे हमाल यांचे दरही वेगवेगळे असतात आणि महाराष्ट्रातले हमाल महाराष्ट्रातच तर गुजरात मधील हमाल गुजरात कडच्या भागातच काम करतात कारण त्यांना त्यांचा परवाना त्या त्या राज्यांमध्ये काम करण्याकरता दिला गेलेला असतो
सुरत ते भुसावळ या दुहेरी इलेक्ट्रिक रेल्वेमार्गावर हे असे अनोखे रेल्वे स्टेशन असून अशा पद्धतीची सगळी गंमत बघण्याकरता आणि खास रेल्वे स्टेशनवर येऊन तेथील वेगवेगळ्या भागात फोटो काढण्याकरता म्हणून भारतातून कित्येक कुटुंबे मुद्दामून येऊन जातात काही वेळा तर एकाच परिवारातील काही सदस्य अर्धे गुजरातमध्ये आणि अर्धे महाराष्ट्रात बसून गप्पा मारत आणि गम्मत जम्मत करत नाष्टा करताना दिसून येतात चला तर मग आपणही एकदा अशा सुंदर अशा आणि एका वेगळ्या स्टेशनला भेट देण्याचे नक्की करा नक्कीच ही आगळीवेगळी भेट प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षातच राहण्यासारखी असेल
म्हणजे शेवटी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की गुजरात मधील इंजिन ड्रायव्हरला महाराष्ट्रातील गार्ड झेंडा दाखवतो आणि महाराष्ट्रातील इंजिन ड्रायव्हरला गुजरात मधील गार्डन झेंडा दाखवतो तेव्हा गाडी निघते
तर मंडळी आहे की नाही असं एक अनोख रेल्वे स्टेशन
संकलन व मराठी अनुवाद
श्रीकृष्ण पंडित रत्नागिरी
9420054040