राहुरी / प्रतिनिधी :
राहुरी येथील कांदा मार्केट सुरू करावे असी मागणी आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर च्या जिल्हाधिकारी साहेबांना ई मेल द्वारे पत्र देवून मागणी केली आहे.
![]() |
| श्री. आप्पासाहेब भिमराज ढुस |
त्यात ढुस यांनी म्हंटले आहे की, राहुरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा कांदा शेतात पडून आहे. कोरोना बंद मुळे एकीकडे कांदा चाळ बांधायला साहित्य मिळत नाही तर दुसरीकडे राहुरी चे कांदा मार्केट बंद आहे. त्यामूळे राहुरीच्या शेतकरी बांधवांना इकडे आड आणि तिकडे विहीर असी अवस्था झाली आहे.
श्रीरामपूर, राहता व अहमदनगर प्रमाणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधे कांदा खरेदी सुरू केल्यास ज्या गरजू शेतकरी बांधवांना पैश्यांची अत्यंत गरज आहे असे शेतकरी आपला कांदा विकुन त्यांची गरज भगवतील. अन्यथा शेतात पडून असलेला कांदा उन किवा अवकाळी पावसाने खराब होण्यची भिती आहे.
तरी कृपया श्रीरामपूर, राहता व अहमदनगर प्रमाणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधे कांदा खरेदी सुरू करने कामी आपले स्तरावरुन संबंधितांना पुढिल योग्य ते आदेश व्हावेत असी विनंती ढुस यांनी केली आहे.
आप्पासाहेब भिमराज ढुस
देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर
मो. 9823035936


