सावळीविहीर (राजकुमार गडकरी)
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत सध्या लॉकडाउन मुळे सर्व काही बंद आहे.मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असून काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सध्या प्रत्येक नागरिकाला पैशाची अडचण भासत असल्यामुळे व सोशल डिस्टंन्स मुळे गर्दी होत असल्याने अनेक लोक बँकेत न जाता एटीएम मधून पैसे काढत आहेत. त्यामुळे सध्या लॉकडाउनच्याकाळात सर्व बँकांच्या एटीएमला महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे प्रत्येक बँकेच्या एटीएम मध्ये दररोज पैसे टाकले जातात. ग्राहकांना पैसे काढणे त्यामुळे सोपे होत आहे.
एटीएम मध्ये पैसे असतात हे लक्षात घेऊनच शिर्डीत काल रात्री विजया बँक शाखेचे शिर्डी तील एटिएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. काल रात्री व आज दि,२६ सकाळी पहाटे यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी जुना पिंपळवाडी रोडला असणाऱ्या विजया बँकेच्या शाखे जवळच दक्षिणेला तोंड करून असलेल्या एका इमारतीच्या गाळ्यांमध्ये मोठ्या सुरक्षेत एटीएम विजया बँकेचे आहे ,मात्र लॉकडाउन काळात सर्व काही बंद असताना रात्री शांततेचा व सामसूम वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी हे विजया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम अगदी चौकाच्या ठिकाणी असून येथे अनेक दुकाने आहेत, मात्र रात्रीच्या वेळेस संपूर्ण परिसर बंद व शांत होता .त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडून तोडले, एटीएम मधून किती पैसे गेले किंवा काय। तसेच चौकातील किंवा दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमे्रामध्ये कोणी व्यक्ती दिसून येतात की काय । याचा तपास पोलिस करत आहेत. शिर्डीत अनेक राष्ट्रीयकृत व सहकारी,खाजगी बँका आहेत. अनेक बँकांचे एटीएम शिर्डीत आहेत. मात्र शिर्डीत एटीएम फोडल्यामुळे इतर बँकेच्या एटीएम व बँक शाखा व्यवस्थापकांना, कर्मचाऱ्यांनाही त्यामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे.


